Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Hadapsar : पत्नीवर भररस्त्यात चाकूने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना … पतीला अटक!

महाराष्ट्र 14 न्यूज : पत्नी सासरी राहण्यासाठी येत नसल्याच्या रागातून पतीने पत्नीवर भररस्त्यात चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हडपसर भेकराईनगरमधील शिवशक्तीनगर चौकात घडली.

शुभांगी सागर लोखंडे (वय 21, भेकराईनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सागर बाळू लोखंडे (वय 23,रा. उरळी देवाची,मुळ विजयवाडी अकलुज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेणूका राजू हनवते (वय 37,रा. भेकराईनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

Google Ad

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी सागर व्यसनी असून त्याला दारू आणि गांजाचे व्यसन आहे. व्यसनाला कंटाळून शुभांगी त्याच्यासोबत राहत नव्हती. ती भेकराईनगरमध्ये आई-वडीलांकडे राहण्यासाठी गेली होती.

पत्नी राहत नाही याचा सागरला राग होता. त्यातुनच त्याने आज सकाळी साडेनऊच्या सुमारास शुभांगीवर भररस्त्यात चाकूने वार केले. उपचारासाठी शुभांगीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी हडपसर पोलिस तपास करत आहेत. हडपसर पोलिसांनी सागर लोखंडे याचा शोध घेऊन त्याला अटक केली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!