Google Ad
Editor Choice Maharashtra

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट … सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही होणार लाभ!

महाराष्ट्र 14 न्यूज, ( ११ डिसेंबर ) : औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ७६२४ अधिकारी व कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत तसेच २२०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशा अधिकारी व कर्मचा – यांना ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाचे पहिले २ हप्ते जानेवारी २०२१ मध्ये देणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली . यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , स्थायी समिती सभापती संतोष लोंढे उपस्थित होते .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेल्या ७६२४ अधिकारी / कर्मचारी व सेवानिवृत्त झालेल्या २२०० अधिकारी / कर्मचा – यांना दि . १ जानेवारी २०१६ ते ३१ मे २०२० पर्यंतचा ७ वा वेतन आयोगाचा फरक एकूण ५ हप्तांमध्ये रोखीने अदा करण्यास मान्यता दिली होती . त्यानुसार माहे जुलै २०२० व जानेवारी २०२१ मध्ये देय असणारे फरकाचे २ हप्ते जानेवारी २०२१ मध्ये अदा करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे .

Google Ad

दोन्ही हप्ताची अंदाजे र.रु. १४० कोटी कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना देय होणार असून त्यासाठी आवश्यक तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे . उर्वरित ३ हप्ते प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलै महिन्यात देण्यात येणार आहेत .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!