Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राष्ट्रवादी कांग्रेस सांगवी – पिंपळेगुरव ब्लॉकचे अध्यक्ष ‘शिवाजी पाडुळे’ यांचेवतीने अनोखी भाऊबीज दिवाळीभेट!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला होता, वेळ खूप वाईट होती प्रसंग आठवला तरी अंगावर शहारे येतात, अशा या कोरोना काळात आरोग्य सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या तसेच कुटुंबाची काळजी न करता रात्रंदिवस नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याला महत्त्व दिले,आणि खरेखुरे कोरोना योद्धे म्हणून जनतेची सेवा केली.

Google Ad

अशा कष्टकरी गोरगरीब कुटुंबाची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून त्यांच्या घरातही दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश यावा या करीता पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी- पिंपळे गुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शिवाजी पाडुळे यांच्या वतीने नवी सांगवी- पिंपळे गुरव परिसरात साफसफाई करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना तसेच घरकाम करणाऱ्या भगिनींना कपडे, साडी तसेच आरोग्यासाठी वाफेचे मशीन अशी अनोखी दिवाळी भेट भाऊबीजेच्या निमित्ताने देण्यात आली. हे साहित्य वाटप करून कामगारांच्या जीवनात प्रकाश फुलविला, यामुळे कामगार महिलांची दिवाळी गोड झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. याप्रकारे अनेक सेवाभावी उपक्रम शिवाजी पाडुळे यांनी या परिसरात कोरोनाच्या काळातही राबविले आहेत.

यावेळी बोलताना शिवाजी पाडुळे म्हणाले” कोरोनाच्या या महाभयंकर संकट काळात आपला जीव धोक्यात घालून स्वतःच्या कुटूंबाची पर्वा न करता या कामगारांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्या घासातील एक घास देऊन आपल्या कामगार भगिनींची दिवाळी गोड केली पाहिजे, त्यांच्या जीवनात प्रकाश फुलवणे हे आपले नागरिक म्हणून कर्तव्य आणि जबाबदारी आहे.

यावेळी राष्ट्रवादी कॅांग्रेस सांगवी-पिंपळेगुरव ब्लॅाकचे अध्यक्ष शिवाजी पाडुळे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवकप्रभारी प्रणव ढमाले सामाजिकन्याय कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार ,सोशलमीडीया चिंचवड प्रमुख विकास लोले ,ऊद्योजक सुनील गावडे , शशीकांत ढमाले ,प्रताप राणे , सुरेश ढमाले प्रमोद करपे, ओंकार गोडांबे , वार्डअध्यक्ष मुजाहीद बागवान गौरव पाडुळे ,संकेत गुळवे तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!