Google Ad
Editor Choice Maharashtra

Nashik : बनावट कार्डच्या सहाय्याने एटीएममधून पैसे काढून पलायन करणाऱ्या एकाला अटक

महाराष्ट्र 14 न्यूज : लासलगावमध्ये बनावट कार्डच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढून पलायन करणाऱ्या एकाला सतर्क नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे दोन साथीदार फरार झाले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून बनावट कार्डच्या सहाय्याने पैसे काढण्यात आले. ज्या शेतकऱ्याचे पैसे काढले. त्याने तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीला पैशाबाबत विचारणा केल्यानंतर तो पळून जात होता.

लासलगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येवला तालुक्यातील नीळखेडे येथील शेतकरी अरुण कदम हे आले असता एटीएममधून पैसे येत नाही, आम्ही तुम्हला मदत करतो असे सांगून शेतकरी कदम यांच्याकडील पिन घेत एटीएम कार्ड बदलून बनावट एटीएम कार्डच्या सह्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला.

Google Ad

पैसे येत नाही म्हणून कदम हे तेथून निघून जाण्याच्या तयारीत असताना कदम यांचे बदललेल्या एटीएम कार्डच्या सह्याने पैसे दुसऱ्या साथीदाराने काढल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, संशयीत आरोपी सुनील हटकर याला शेतकरी कदम यांनी विचारणा केली असता तेथून तो पळ काढण्याच्या तयारीत होता. कदम यांनी आरडाओरडा केल्याने सतर्क नागरिकांच्या मदतीने सुनील हटकर याला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले.

मात्र दोघे सहकारी पळून जाण्यात यशस्वी झालेत. पकडण्यात आलेल्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याजवळ विविध बँकेचे बनावट एटीएम कार्ड आणि मोबाईल तसेच रोख रक्कम ५१ हजार रुपये सापडले. पोलिसांनी पैसे आणि बनावट एटीएम आणि मोबाईल जप्त केले आहेत. अटक करणाऱ्याने नाशिक जिल्ह्यातील देवळा, येवला तसेच बीड जिल्ह्यातील लोहा येथे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. याप्रकरणी दोघे फरार चोरट्यांचा लासलगाव पोलीस शोध घेत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

64 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!