Google Ad
Editor Choice Maharashtra

Nagpur : मुंबई , पुणे आणि ठाण्याच्या तुलनेत नागपुरात लोकसंख्या कमी, पण … नागपुरात कोरोना संक्रमण हाताबाहेर ?

महाराष्ट्र 14 न्यूज : नागपुरात कोरोनाचा संक्रमण हाताबाहेर का जात आहे. या संदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांच्या नेतृत्वात नागपुरात दाखल झालेल्या उच्च स्तरीय तज्ज्ञ समितीने नागपूरच्या स्थितीचा अभ्यास करत अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या आहेत. शिवाय एकेकाळी नागपुरात स्थिती नियंत्रणात असताना परिस्थिती का बिघडली आणि कोरोनाचा विळखा शहरावर घट्ट का बसला याबद्दलची कारणमीमांसा ही त्यांनी केली आहे. त्यामुळे नागपुरात अधिकाऱ्यांमधील इगोच्या लढाईत बिघडलेली परिस्थिती आता नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे.

नागपूर म्हणजे, राज्याची उपराजधानी… मुंबई, पुणे आणि ठाण्याच्या तुलनेत लोकसंख्या कमी आहे. लोकसंख्येचे घनत्व कमी असल्याने दाटिवाटीही नाही. मात्र, गेल्या काही आठवड्यात नागपुरात कोरोनाचा फैलाव तीव्रतेने झाला. काही महिन्यांपूर्वी नागपुरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच नागपूरचा रिकव्हरी रेट देशपातळीवर आदर्श मानला जात होता. त्याच नागपुरात गेले 10 ते 15 दिवस रोज हजारो कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. तर रोज 40 ते 50 रुग्णांचा मृत्यूही होत आहे. त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला होता की, नागपुरात स्थिती का बिघडली. गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांच्या नेतृत्वात 5 सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीने काल नागपूरचा दौरा केला. इथल्या प्रशासनाशी बोलून नागपूरच्या स्थितीचा अभ्यास करत काही सूचना केल्या आहेत.

Google Ad
Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!