Google Ad
Editor Choice Pune District

पुणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर असणाऱ्या बोगस अनुसूचितजमातीच्या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची हिंदवी ट्रस्टच्या ‘सुजाता निगळे’ याची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : जिल्हापरिषदेच्या आस्थापनेवर असणाऱ्या अनुसुचित जमातीच्या कर्मचारी व आधिकारी यांना विशिष्ट मुद्दतील जातपडताळणी प्रमाणपत्र कार्यालयास सादर करणे बंधनकारक असून विशिष्ट मुद्दतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न करणा – या कर्मचारी व अधिकारी यांच्यावर आपण काय कारवाई केली व कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन हिंदवी चॅरिटेबल ट्रस्ट भोसरी यांनी आरोग्य सेवा संचालक ( २ ) डॉ अर्चना पाटील व मुख्यकार्यकारी अधिकारी पुणे जिल्हापरिषद यांना दिले आहे.

या निवेदनात ट्रस्टच्या अध्यक्षा सुजाता निगळे यांनी म्हटले आहे की, आम्ही वारंवार आपणाकडे पत्रव्यवहार करत आहे, यावर आपण आतापर्यंत काय कार्यवाही केली व करणार आहात याबाबत आपल्या अधिपत्या खाली येणा – या सर्व सार्वजनिक आरोग्य सेवा महाराष्ट्र राज्य कार्यालय निहाय खुलासा मिळावा. यात म्हटले आहे की, पुणे जिल्हा परिषद , पुणे यांच्या आस्थापनेवर असना – या सर्व विभागीय कर्मचारी व आधिकारी यांचे अनुसूचित जमातीचे पडताळणी प्रमाणपत्र सबंधित कार्यालयास सादर न करता कर्मचारी व आधिकारी अनेक वर्षे नोकरी करत आहेत .

Google Ad

आशा कर्मचारी व आधिकारी यांच्यावर आपण आता पर्यंत काय कारवाई केली व काय कारवाई करणार आहात . आपल्या अंतर्गत येणा – या सर्व कार्यालय प्रमुखांच्या निष्काळजी पणामुळे अनुसुचित जागेवर बोगस कर्म चारी व अधिकारी काम करत असतील तर या समाजावर अन्याय होत असावा असे आम्हास वाटते . आमच्या माहिती प्रमाणे नोकरी मिळाले पासून ६ महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.ज्या कार्यालयातील कर्मचारी व आधिकारी यांनी ६ महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही . तसेच सबंधित कर्मचारी व आधिकारी यांनी वेळोवेळी अनुसूचित जमातीचे पडताळणी प्रमाणपत्र मागणी का केली नाही . मागणी न करणा – या आशा कार्यालया प्रमुखांवर आपन काय कारवाई करणार आहात . या आशयाचे निवेदन सुजाता निगळे यांनी दि .३०.०७.२०२० रोजी दिले होते त्याचा खुलासा झाला नाही, म्हणून पुन्हा हे निवेदन दिले आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून संस्थेस लेखी अथवा तोंडी कोणत्याही प्रकारे संपर्क करण्यात आला नाही . या वरून आसे दिसून येते की , अनुसुचित जमातीच्या विरोधात बोगसाना अभय देत असल्याचे दिसत आहे.

हिंदवी ट्रस्ट ने ही प्रत , योग्य कार्यवाही साठी सचिव सो . केंदिय आदिवासी मंत्रालय , भारतसरकार , ( आदिवासी तक्रार विभाग ) रूम नं . २७ ९ – एफ , ऑगस्त क्रांती भवन , आर . के . पुरम , नवी दिल्ली ११० ०६६ . आणि अनुसंधान आधिकारी सो . राष्ट्रीय अनुसुचित जनजाती आयोग , रूम नं .३० ९ , निर्माण सदन , सी.जी.ओ. इमारत , आरोरा हिल्स , भोपाळ ४६२०११ . तसेच सचिव आदिवासी विकास मंत्रालय , हुतात्मा राजगुरू चौक , मुंबई . डॉ . प्रदिपकुमार व्यास साो . प्रधान सचिव , संचानालय सार्वजनिक आरोग्य विभाग , मुंबई . यांना पाठवली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!