Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : हे मंत्री म्हणाले … ‘माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी’!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच लवकरच कोरोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम असल्याचे ही श्री मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

राज्यात आतापर्यंत अनेक आमदार खासदारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे.
यापूर्वी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली होती. गृहमंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांसह अनेक राज्यमंत्री या विषाणूचा बळी ठरले आहेत.

Google Ad

आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आवाडे, खासदार संजय मंडलिक, खासदार राजू शेट्टी, माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत असताना, आज ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!