Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : बिहार विधानसभा निवडणूकिसाठी शिवसेना सज्ज … हे आहेत २० स्टार कॅम्पेनर्स!

महाराष्ट्र 14 न्यूज : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना देखील सज्ज झाली आहे. बिहारच्या निवडणुकीत शिवसेना उतरणार असल्याचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यानंतर आता शिवसेनेने आपल्या स्टार कॅम्पनेर्सची यादी देखील जाहीर केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून २० जण स्टार कॅम्पेनर सज्ज झाले आहेत. २०१५ मध्ये शिवसेनेनं ८० जागा लढवत २ लाखांपेक्षा जास्त मतं घेतली होती.

या स्टार कॅम्पेनर यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह २० जणांचा समावेश आहे. सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, गुलाबराव पाटील, राजकुमार बाफना, प्रियांका चतुर्वेदी, राहूल शेवाळे, कृपाल तुमाने, सुनील चिटणीस, योगराज शर्मा, विनय शुक्ला, गुलाबचंद दुबे, अखिलेश तिवारी आणि अशोक तिवारी हे स्टार कॅम्पेनर असणार आहेत.

Google Ad

शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडं ही यादी सोपावली आहे. शिवसेना बिहारमध्ये ५० जागा लढवण्याच्या तयारीत आहे. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्याविरोधात शिवसेना प्रचारात उतरणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण आता जेडीयूने गुप्तेश्वर पांडेंचे तिकिट कापल्याचे वृत्त आहे. आता शिवसेनेची रणनिती काय असणार ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!