Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : सारथी संस्थेला पुण्यात जागा देण्याचा निर्णय … मराठा समाजातील तरुणांना दिलासा मिळणार!

महाराष्ट्र 14 न्यूज : मराठा आणि कुणबी समाजाच्या विकासासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या सारथी संस्थेसाठी राज्यसरकारने पुण्यातील शिवाजीनगर येथील भांबुर्डा येथे ४ हजार १६३ चौरस मीटरची जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले असले तरी अद्याप मराठा समाजातील तरुण आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत.

मात्र, आरक्षण मिळण्यापूर्वी मराठा समाजातील तरुण वर्गाला शिक्षण क्षेत्रात दिलासा मिळावा यासाठी सारथी संस्था राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. आता या संस्थेच्या इमारतीसाठी जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने मराठा समाजातील तरुणांना दिलासा मिळणार आहे. मराठा आणि कुणबी समाजाचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकास व्हावा या उद्दिष्टाने सारथी संस्थेची स्थापना २०१८ मध्ये राज्यसरकारकडून करण्यात आली होती.

Google Ad

पुण्यातील जागेवर बांधण्यात येणार्‍या इमारतीत शासकीय कार्यालय, अभ्यागत कक्ष, अभ्यास केंद्र, ग्रंथालय, अभ्यासिका, हॉल आणि इतर सुविधा देण्यात येणार आहेत. केवळ नावापुरती सारथी संस्थेची स्थापना केली गेली असून या संस्थेमार्फत कोणताही लाभ मिळत नसल्याचे आरोप वेळोवेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी केला होता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

81 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!