Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : भाजपचं दोन दिवस मॅरेथॉन मंथन … कोअर कमिटीचे बडे नेते हजर, विनोद तावडेंना स्थान नाही!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्य भाजपने मॅरेथॉन बैठकांचा आयोजन केलं आहे. येत्या 5 आणि: राज्य भाजपने मॅरेथॉन बैठकांचा आयोजन केलं आहे. येत्या 5 आणि 6 जानेवारी अर्थात उद्या आणि परवा सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत महामंथन होणार आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुका, सध्याची राजकीय स्थिती, ग्राम पंचायत आणि महापालिकांच्या निवडणुका हे विषय फोकस असण्याची चिन्हं आहेत. महामंथन होणार आहे.

या बैठकीमध्ये आगामी निवडणुका, सध्याची राजकीय स्थिती, ग्राम पंचायत आणि महापालिकांच्या निवडणुका हे विषय फोकस असण्याची चिन्हं आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्य कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित असताना, विनोद तावडे यांना मात्र या बैठकीला स्थान देण्यात आलेलं नाही. विनोद तावडे हे राज्य कार्यकारिणीमध्येही नाहीत. त्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित राहू शकतात. मात्र पक्षाचा जुना जाणता नेता असताना, महत्त्वाच्या बैठकीला गैरहजर असणं अपेक्षित नाही.

Google Ad

5 तारखेला प्रदेश पदाधिकारी आणि विविध मोर्चाच्या अध्यक्षांची बैठक आहे. तर संध्याकाळी 7 वाजता कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे विनोद तावडे यांना कोर कमिटीत स्थान नाही. दुसऱ्या दिवशी 6 तारखेला पाचही महापालिका निवडणुकी संदर्भात इलेक्शन कमिटीची बैठक होणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!