Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : Airtel ची Jio ला टक्कर , 499 रुपयांमध्ये Xstream प्लॅन लॉन्च

महाराष्ट्र 14 न्यूज : टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने (Airtel) नवा Xstream प्लॅन लॉन्च केला आहे (Airtel launch Xstream plan). 499 रुपयांपासून सुरु होणाऱ्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा देण्यात येणार आहे. नुकताच रिलायन्स जिओने जीओ फायबरच्या (JioFiber) नव्या प्लॅनची घोषणा केली. याची सुरुवात 399 रुपयांपासून होत आहे. Airtel Xstream या प्लॅनअंतर्गत कंपनी 1 GBps पर्यंत स्पीड देणार असल्याचा दावा एअरटेलने केला आहे.

यासोबतच अनलिमिटेड डेटा, अँड्रॉईड 4K टीव्ही बॉक्स आणि सर्व OTT अॅपची सुविधा देखील देण्यात आली आहे. 499 रुपयांच्या Airtel Xtream प्लॅनमध्ये 40Mbps चा स्पीड मिळणार आहे. तसेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगची व्यवस्था असेल. सोबत एअरटेल Xtream 4K टीव्ही बॉक्सही देण्यात येणार आहे. या प्लॅनसोबत एअरटेलच्या OTT प्लॅटफॉर्मचाही वापर करता येणार आहे.

Google Ad

एअरटेलचा दुसरा प्लॅन 799 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 100Mbps चा स्पीड देण्यात येणार आहे. या प्लॅनमध्ये देखील कंपनीने अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग दिले आहे. या प्लॅनसोबतही एअरटेल OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

तिसरा प्लॅन 999 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 200Mpbs चा स्पीड मिळणार आहे. या प्लॅनमध्ये देखील अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग मोफत असेल. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये Airtel XStream शिवाय इतर दुसऱ्या OTT अॅपचं सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. यात Disney+Hotstar, Amazon Prime Video आणि Zee5 चा समावेश आहे.

चौथ्या प्लॅनची किंमत 1,499 रुपये असणार आहे. या प्लॅनमध्ये 300 Mbps च्या स्पीडसह कॉलिंग आणि अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. या प्लॅनसोबत सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. एअरटेलचा पाचवा प्लॅन 3,999 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये का1GBps चा स्पीड असणार आहे. या प्लॅनमध्ये देखील डेटा आणि कॉलिंग अलनिमिटेड देण्यात आलं आहे. सोबतच सर्व OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन मोफत असेल.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!