Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पुण्याचे खासदार म्हणाले, … ‘लॉकडाऊन हा अंतीम पर्याय नाही, तो कोणालाही परवडणारा नाही!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१ एप्रिल) : पुण्यात वाढत्या कोरोनारुग्ण संख्येबरोबरच लॉकडाऊनच्या अफवांना देखील पेव फुठला आहे. राज्यात पुन्हा एकदा 2 एप्रिलनंतर लॉकडाऊन करणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र यासोबतच संभाव्य लॉकडाऊनला विरोध देखील वाढला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी परिस्थिती पाहून २ एप्रिलला लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ असे सांगितले होते. मात्र खासदार गिरीश बापट यांनी लॉकडाऊन विरोध करत पुन्हा लॉकडाऊन परवडणार नसल्याचे म्हटले आहे.

पुण्यात भाजप खासदार गिरीश बापट यांच्यासह महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी बोलताना बापट म्हणाले की, राज्य सरकार लॉकडाऊनचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. मात्र, त्याला आमचा पूर्ण विरोध असणार आहे. साथीचे रोग ही राज्य सरकारची जबाबदारी असते. त्यामुळे राज्य सरकारने पुणे महापालिकेला 500 कोटी रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Google Ad

गिरीश बापट म्हणाले की, ‘लॉकडाऊन हा अंतीम पर्याय नाही. त्यामुळे लॉकडाऊन आमचा सक्त विरोध आहे. लॉकडाऊनऐवजी रूग्णांसाठी खाटा वाढवा, लसीकरण वाढवा, विलगीकरण कक्ष उभे करा असा आमचा आग्रह असून पायाभूत सुविधा वाढविणे हाच यावर पर्याय आहे. जम्बो कोवीड रूग्णालय सध्या तीनशे संख्येच्या क्षमतेने सुरू केले आहे. ही क्षमता आम्ही आठशेपर्यंत वाढविण्यासाठी निधीची गरज आहे. यासाठी लागणारा संपूर्ण निधी सध्या महापालिकेने उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे यात राज्य सरकारने मदत करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!