Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोनाच्या संसर्गाने सर्वाधिक जेष्ठ नागरिकांचा मृत्यू!

महाराष्ट्र 14 न्यूज : करोनामुळे मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण ज्येष्ठ नागरिकांचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात आत्तापर्यंत करोनामुळे 500 ज्येष्ठांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधित 5 हजार 758 ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत मृत्यू होणाऱ्या ज्येष्ठांचे प्रमाण 8.68 टक्के इतके असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

शहरामध्ये करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. करोनाबाधितांची संख्या शनिवारी सायंकाळपर्यंत 47 हजार 660 इतकी झाली आहे. त्यातील 33 हजार 272 रुग्ण आत्तापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. कोवीड डॅशबोर्डनुसार, शनिवारी दुपारपर्यंत करोनामुळे 825 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याची वयोगटनिहाय माहिती घेतली असता शहरात आज सायंकाळपर्यंत 5 हजार 758 ज्येष्ठ नागरिक करोनाबाधित आढळले आहेत. त्यातील 500 ज्येष्ठांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. टक्केवारीत हे प्रमाण 8.68 टक्के इतके होते. ज्येष्ठांच्या मृत्यूचा हा वाढता दर रोखण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असणार आहे.

Google Ad

बालमृत्यूचे प्रमाण सर्वात कमी करोनामुळे बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. शून्य ते 12 वयोगटातील 4 हजार 156 जणांना करोनाची लागण झाली. त्यातील एकाचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. हे प्रमाण 0.02 टक्के इतके आहे. 13 ते 21 वयोगटातील 4 हजार 186 बाधितांपैकी दोघांचा मृत्यू झाला. हे प्रमाण 0.04 टक्के इतके आहे. 22 ते 39 वयोगटात सर्वाधिक 18 हजार 851 जण बाधित झाले. त्यातील 52 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हे प्रमाण 0.27 टक्के इतके आहे. 40 ते 59 वयोगटातील 14 हजार 226 जणांना करोनाची लागण झाली. त्यापैकी 270 जणांचा मृत्यू झाला. टक्केवारीत हे प्रमाण 1.89 टक्के इतके आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

36 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!