Google Ad
Editor Choice

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सुचनेची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतली दखल … खाजगी रुग्णवाहिकांना दर्शनी भागात दरपत्रक लावणे केले बंधनकारक!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या प्रादुर्भावामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढली आहे. असे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी त्यांचे कुटुंबिय व नातेवाईकांकडून खासगी रुग्णवाहिकाचालक तासाला १ हजार ते ३ हजार रुपये घेत आहेत. हे म्हणजे मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार आहे. मृतांचे कुटुंबिय किंवा नातेवाईक दुःखात असल्यामुळे ते आपली होणारी आर्थिक लूट गपगुमान सहन करत आहेत.

हे कुठे तरी थांबले पाहिजे यासाठी पिंपरी-चिंचवडमधील सर्व खासगी रुग्णवाहिका त्याब्यात घेऊन त्यांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत संचलन व्हावे. तसेच नागरिकांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक सुरू करावी, अशी सूचना आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना केली दोन दिवसांपूर्वी केली होती. या सुचनेची पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दखल घेत रुग्णवाहिकेत दरपत्रक लावण्याच्या सूचना खाजगी रुग्णवाहिका चालकांना दिल्या आहेत.

Google Ad

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दरपत्रकानुसार तीन प्रकारच्या रुग्णवाहिकांना ११ रुपये पासून १३ रुपये प्रति किलो मीटर भाडे आकारता येणार आहे . पहिल्या २५ किलोमीटरसाठी अथवा दोन तासांसाठी ५०० ते ९०० रुपये भाडे आकारता येणार आहे . रुग्णवाहिका चालकांनी सदर दरपत्रक हे रुग्णवाहिकेच्या आतील बाजूला दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आल्याची माहीती परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!