Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

भोसरीतील इंद्रायणी नगर येथे झालेल्या विद्युत रोहित्राच्या स्फोटातील मृतांच्या कुटूंबियांची महापौर ‘उषा ढोरे’ यांनी घेतली भेट …

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि . ०७ सप्टेंबर ) : भोसरी येथील इंद्रायणी नगर येथे झालेल्या विद्युत रोहित्राच्या स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांची आज महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी त्यांच्या कोतवालवाडी , च – होली येथील घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांचे मांत्वन केले . महापालिकेच्यावतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी महापौर ढोरे यांनी या कुटुंबियांना दिले . यावेळी माजी महापौर नगरसेवक नितीन काळजे , नगरसेविका नम्रता लोंढे , सुवर्णा बुर्डे , सामाजिक कार्यकर्ते विकास बुर्डे आदी उपस्थित होते . महापौर ढोरे यांनी इंद्रायणीनगर येथील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली .

परिसरातील नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली . शनिवार दि . मप्टेंबर रोजी इंद्रायणीनगरमध्ये विद्युत रोहित्राचा स्फोट झाला . या स्फोटात एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या . यामध्ये शिवन्या सचिन काकडे या ५ महिन्याच्या बालिकेसह तीची आई हर्षदा सचिन काकडे आणि आजी शारदा दिलीप कोतवाल यांचा समावेश आहे . यातील शिवन्या आणि शारदा कोतवाल यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला . तर हर्षदा काकडे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली . घटनेचे गांभिर्य पाहता शहरात यापुढे अशाप्रकारच्या गंभीर घटना घडून जीवीत अथवा वित्त हानी होऊ नये यासाठी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी महावितरणच्या प्रमुख अधिका – यांची तसेच महापालिका अधिका – यांची दि .८ सप्टेंबर रोजी बैठक बोलावली आहे .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

13 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!