Google Ad
Editor Choice Pune District

Maval : मावळातील तरुणांनी व्यवसायाभिमुख बनावे … माजी राज्यमंत्री बाळा भेगडे

महाराष्ट्र 14 न्यूज : मावळातील तरूणांनी व्यवसायाभिमुख बनावे असे आवाहन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पवनानगर येथे मावळ भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने महागाव गणातील युवक कार्यकर्त्यांचे पवनानगर येथे आयोजित व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात केले. यावेळी पवन मावळातील युवकांना शासकीय योजना आणि रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. मा. राज्यमंत्री बाळा भेगडे, किरण राक्षे आणि शुभम सातकर यांनी तरुणांना व्यवसाय रोजगार संधी यावर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना बाळा भेगडे म्हणाले की, अनेक व्यावसायासाठी शासकीय अनुदान व विविध योजना आहेत. याचा अभ्यास करून मावळातील तरूणांनी व्यवसायाकडे वळले पाहीजे. मावळ तालुका हा भातशेती व पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. येथे दळणवळणाची सर्व साधने उपलब्ध असल्याने तरुणांनी आधुनिक शेतीसह जोड व्यावसायात पदार्पण करावे. कृषी पर्यटन व दुग्ध व्यवसायासोबत इंद्रायणी तांदुळ विक्री, कुक्कुटपालन, पाॅलिहाऊस, बंदिस्त शेळीपालन, मधुमक्षिका पालन यासारख्या सामुहीक कृषी उद्योग करावेत.

Google Ad

यासह टाकवे, आंबी, चाकण, हिंजवडी या औदयोगिक क्षेत्रासाठी लागणारा कच्चा माल पुरवठा करणारे व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढे आले पाहिजे. मावळ मधील प्रत्येक तरूणाचा स्वतंत्र व्यवसाय उभा राहिला पाहिजे, या करिताचे आवश्यक ते मार्गदर्शन व भांडवल उभारणी साठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!