Google Ad
Editor Choice Maharashtra

महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील , यांच्या हस्ते महाराष्ट्रातील कोरोना सेवाकार्यातील भाजपा वैद्यकीय आघाडी E – Book चे प्रकाशन संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.आमदार चंद्रकांतदादा पाटील ,यांना भाजप वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश शिष्टमंडळ भेटले त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील कोरोना सेवाकार्यचे वैद्यकीय आघाडी E- Book चे आज प्रकाशन संपन्न झाले. तसेच, महाराष्ट्रातील विस्कळीत झालेल्या आरोग्य व्यवस्थेबद्दल चर्चा – विचार विनिमय झाली.

महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना  भाजपा महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली .या शिष्टमंडळात भाजप वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ.अजीत गोपछडे,मा.विक्रांत पाटील भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष , महाराष्ट्र , डॉ स्मिता रणजित काळे(बंडगर) संयोजक मुंबई भाजप वैद्यकीय आघाडी , डाॅ राहुल कुलकर्णी संयोजक ठाणे-कल्याण , डाॕ कृष्णा वोरा ,डाॕ मनिषा माने, डाॕ सचिन बंडगर, डाॕ श्याम पोटदुखे आणि विविध वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी भेटून राज्यातील आरोग्य क्षेत्रातील व वैद्यकीय क्षेत्रातील विस्कळीत झालेल्या विविध समस्यांबाबत निवेदन दिले .

Google Ad

सविस्तर चर्चा केली त्या महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.आमदार चंद्रकांतदादा पाटील यांना डॉक्टर्स, डेंटिस्ट पँरामेडीकल, फार्मसिस्ट, टेक्निशियन ,रेडिओग्राफर, परिचारिका व आरोग्य सेवक यांच्या दयनीय अवस्थेबाबत व कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणे बाबत भाजपा महाराष्ट्र प्रदेश वैद्यकिय आघाडीने सविस्तर निवेदन दिले आणि *महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या सोबत खालील मुद्द्यावर विचारविनिमय व चर्चा झाली.

१)डॉक्टर्स ,पँरामेडीकल,डेण्टिस्ट पारीचारीका फार्मसिस्ट, टेक्निशियन,रेडिओग्राफर, व आरोग्य सेवक यांच्यावर होणारे हल्ले, २)महिला वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व पारीचारीकां ची कोविड सेंटर मधील असुरक्षितता ,
३)मृत पावलेल्या खाजगी रुग्णालय डॉक्टरांना 50 लाखांचे विमा संरक्षण कवच नाकारणे, ४)ऑक्सिजनची रेशनिंग करणे, व राज्याला आॅकसीजन चा पुरवठा वाढविण्यावर भर देण्यात यावा.
५)ग्लोव्हज,मास्क, सॕनिटाइझर, फेसशिलड व पीपीई किट आणि गरजेच्या गोष्टींची किंमती भरमसाट वाढणे आणि त्या नियंत्रित न करणे
६)सरकारी डॉक्टर्स,नर्सेस डेंटिस्ट, पँरामेडीकल, फार्मसिस्ट, टेक्निशियन, रेडिओग्राफर आणि आरोग्यसेवक यांची कोविड साठी तातडीची भरती केली परंतु त्यांचे वेतन न देणे.
७)डॉक्टर्स,पँरामेडीकल, डेण्टिस्ट,नर्सेस फार्मसिस्ट,टेक्निशियन, रेडिओग्राफर आणि आरोग्य सेवक यांच्यासाठी कोविड साठी बेड न मिळणे व त्यामुळे या कोरोना योद्धा व आरोग्यसेवकांचे मृत्यू ओढवणे.
८)अत्यावश्यक व जीवनोपयोगी असणारे रेमडेसीविर हे इंजेक्शन उपलब्ध नसणे आणि त्याचा काळाबाजार होणे

यावर महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मा.देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री ,विरोधी पक्ष नेते व केंद्रीय आरोग्य मंत्री मा.हर्ष वर्धन जी यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्रातील विस्कळीत झालेली आरोग्य व्यवस्था त्वरित पूर्वपदावर आणण्याचे आश्वासन दिले. व मी महाराष्ट्र प्रदेश भाजप वैद्यकीय आघाडी तील सर्व डॉक्टर्स पदाधिकाऱी यांना निराश होऊ देणार नाही असा विश्वास दिला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!