Google Ad
Editor Choice Maharashtra

महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर, शिक्षक निवडणूक २०२० निकाल अपडेट्स

महाराष्ट्र 14 न्यूज : ( ८.३० वा. ) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड सुमारे दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगवकर हे सुमारे साडेचार हजार मातांनी आघाडीवर आहेत.

शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवाराच्या विजयचा कोटा रात्री आठ वाजता तर पदवीधरचा कोटा पूर्ण होण्यासाठी रात्री १० वाजण्याची शक्यता आहे. शिक्षक मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर हे आघाडीवर असून, दुसऱ्या स्थानावर विद्यमान आमदार आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत हे आहेत. तिसऱ्या स्थानावर लोकभारती पक्षाचे गोरखनाथ थोरात असून, भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार चौथ्या स्थानावर आहेत.

Google Ad

शिक्षक मतदार संघामध्ये आजगावकर यांना आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत पहिल्या पसंतीची १२५४७ मते, तर सावंत यांना ७७२६ मते मिळाली आहेत. शिक्षक मतदारसंघाचा कोटा सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत निश्चित होण्याची शक्यता आहे, तर पदवीधर मतदारसंघासाठी रात्री दहाच्या सुमारास निश्चित होऊ शकेल, असा अंदाज निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी वर्तविला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!