Google Ad
Maharashtra crimes Pune District

Chakan : अंधाराचा फायदा घेवुन कंपनी कामगारास लुटणारे ०६ लुटारु जेरबंद … महाळुगे पोलिस व गुन्हे शाखा क्राईमची कामगिरी!

महाराष्ट्र 14 न्यूज : खराबवाडी , ता खेड जि पुणे येथील मॅट्रिक्स हॉटेल जवळ चाकण तळेगाव रोडने जाणारे श्री अनिल मारुतराव शिंगणापुरे हे दि २०/०१/२०२१ रोजी राञौ १२:३० वा चे सुमारास कंपनी मधुन सुट्टी झालेवर मोटार सायकल वरुन घरी जात असताना त्यांना ६ अज्ञात चोरटयांनी अडवुन त्यांचेकडील रोख रक्कम व मोबाईल फोन असा १५,१५० / रु चा ऐवज लुटला होता . त्याबाबत महाळुगे पोलीस चौकी येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता .

सदर गुन्हयामध्ये फिर्यादीस अडवुन त्यांचेकडील १५,१५० / रु ऐवज लुटणारे लुटारु बाबत काहीएक उपयुक्त माहीती प्राप्त नसताना गुन्हे शाखेच्या क्राईम युनिट ३ चे अधिकारी व स्टाफचे मदतीने तांत्रिक गोष्टींचे आधारे व गोपनिय बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमीचे आधारे ०३ संशयीत व्यक्तिस ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी गुन्हयाचे कबुल केले . त्यांचेकडे तपास करुन त्यांचे इतर ३ साथीदारांना अटक केली आहे .

Google Ad

अटक आरोपी १ ) रवी दादु ठाकर वय २४ वर्ष , रा – ठाकरवस्ती , रासे , ता खेड जि पुणे २ ) योगेश नाथु मेंगाळ वय २३ वर्ष , रा- सदर ३ ) धनेश फकीर ठाकर वय २२ वर्ष , रा- सदर ४ ) लक्ष्मण कैलास मेंगाळ वय २० वर्ष , रा- सदर ५ ) निखील सखाराम मेंगाळ वय २५ वर्ष , रा- सदर ६ ) समीर भिकाजी जाधव वय २६ वर्ष , रा – ठाकरवस्ती , रेटवडी , ता खेड जि पुणे सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश , मा अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, मा पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) श्री सुधीर हिरेमठ

मा पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ – श्री मंचक इप्पर , सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राम जाधव , महाळुगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार व क्राईम युनिट ३ चे पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण , पोलीस उपनिरीक्षक गिरीष चामले पोलीस फौजदार तात्या टोपे , मधुकर पानसरे , पोलीस हवालदार प्रकाश नवले , ज्ञानेदव आटोळे , श्रीधन इचके , किरण सांगळे , आणि क्राईम युनिट ३ चे पोलीस हवालदार कोळेकर , ढाकणे , नांगरे यांनी केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!