Google Ad
Editor Choice Uncategorized

लक्ष 2022 : यांचीही भाजपातून उडी मारत आयडियाची कल्पना … आता नवीन उडी कुठे?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.21फेब्रुवारी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवणुकीचे बिगुल वाजले आहे, त्यामुळे राजकारणातील आयाराम गयाराम यांचा ठरलेला कार्यक्रम आता जोर धरू लागला आहे. त्यामुळे आपण मागील पाच वर्षात काय दिवे लावले हे जनतेला माहीत आहे, असे असताना आपल्याला जनता आता जाब विचारणार? या भितेने अनेकणांनी आता वेगेगळ्या आयडियाच्या कल्पना मांडायला सुरुवात केली आहे.

पण… ‘ये पब्लिक है’ सब जानती है!हे यांना कोण सांगणार…

Google Ad

शहरात चार दिवसांपूर्वीच मोशीचे वसंत बोराटे यांनी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन मनगटावर घड्याळ बांधले आहे. आता चिंचवड विधानसभा मतदारसंघातील चंदा लोखंडे ज्यांना आमदार लक्ष्मण जगताप यांनी राजकारणात मोठी ओळख आणि उंची निर्माण करून दिली, मोठी मोठी पदे दिली. प्रसंगी आपल्या माणसांचे वैर घेऊन उमेदवारी दिली, आणि आता जनता आपल्याला जाब विचारेल या भीतीने तसेच नगरसेकपदाचा कालावधी संपत आल्याने नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन आपल्या पतींसोबत जाणे पसंद केले. आमदार लक्ष्मण जगताप यांचे बॅनर वापरून पाच वर्षात त्यांच्या माध्यमातून आपल्या भागात कामे करून घेली, हे जनतेला माहीत आहे, आणि हे ते ही नाकारू शकत नाहीत. तसे असते तर त्यांनी मागील पाच वर्षात केव्हाही पक्षाला रामराम ठोकला असता, पण तसे घडले नाही…

हे पहा👇🏻, कोणाच्या माध्यमातून केली कामे…

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत पिंपळेगुरव, वैदूवस्तीमधून लोखंडे खुल्या जागेतून भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. भाजप कडून सर्वकाही मिळवलं, त्यांनी महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपदही भूषविले. त्यांचे पती माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनाही नगरसेकपदाच्या कार्य काळात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्ममातून अनेक चंगली पदे मिळाली. त्यांनी ऑगस्ट 2021 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे चंदा लोखंडे या पक्ष सोडणार हे नक्की होते, पिंपळे गुरव मध्ये मागील महिन्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पालकंत्र्यांच्या सोबत बॅनरबाजी केली होती, ती सर्वश्रुत आहे, त्यावेळेसच सर्व सर्वसामन्यापर्यंत जायचा तो मेसेज गेला होता, जनता एवढीही दूधखूळी नाही, हे ईकडून तिकडे उड्या मारणाऱ्यानी लक्षात ठेवले पाहिजे, नाहीतर जनता त्यांना लक्षात ठेवणार हे नक्की…

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!