Google Ad
Uncategorized

पिंपिरीचिंचवड महानगपालिकेतर्फे ठेकेदार पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगार वर्गातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिलांची बाजू शिवसेना पक्षाच्या भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सौ. सुषमाताई अजित शेलार यांनी मांडली बाजू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 18 फेब्रुवारी) : पिंपिरीचिंचवड महानगपालिकेतर्फे ठेकेदार पद्धती वर काम करणाऱ्या स्वच्छता कामगार वर्गातील महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिलांची बाजू शिवसेना पक्षाच्या भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सौ. सुषमाताई अजित शेलार यांनी मांडली.

दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी तील महानगरपालिकेकडून या भागातील साफफाईसाठी स्वच्छता करण्यात येणाऱ्या कामगार वर्गाचे ठेकेदार बदल्याणे तसेच सर्व स्वच्छता कामगार वर्गातील महिला ना कामावरून काढून नवीन भरती करण्यात येत असल्याने, सर्व महिला शिवसेना पक्षाच्या भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सौ. सुषमाताई अजित शेलार यांच्या जवळ आपले गाऱ्हाणे माडण्या करीता गेल्या असता त्यांनी थेट महानगरपालिका ह प्रभाग मधील वरिष्ठ अधिकारी थोरात यांच्याशी सर्व महिला ला घेऊन भेट घेऊन ठेकेदार जरी बदलला तरी स्वच्छता महिला कामगार तेच ठेवावेत, या बाबत त्यांची व्यथा मांडून निवेदन दिले.

Google Ad

यावेळी सुषमा शेलार यांनी या महिलांना न्याय द्या, अन्यथा संतप्त स्वच्छता महिला कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी मोठया प्रमाणात आंदोलन करण्यात येईल , कामावरून महिलांना काढल्यास काम बंद करण्यात येईल, असा बैधडक इशारा शिवसेना पक्षाच्या भारतीय कामगार संघटना पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सौ. सुषमाताई अजित शेलार यांनी दिला.

यावेळी महानगरपालिका ह प्रभाग मधील वरिष्ठ अधिकारी थोरात यांनी सांगितले की. आम्ही जून्या महिला ना कामावरून काढू देणार नाही , महानगरपालिकेच्या नवीन बजेट प्रत नुसार महिला कामावरून कमी करायची वेळ आली असता, अशा परिस्थित ही स्वच्छता कामगार वर्गातील महिला ला आम्ही दुस-या ठिकाणी कामासाठी पाठवू पण कोणाला ही कामावरून काढणार नाही हा शब्द महानगरपालिका ह प्रभाग मधील वरिष्ठ अधिकारी थोरात यांनी दिला असता, सर्व स्वच्छता कामगार वर्गातील महिला ना दिलासा भेटल्याचे दिसून आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!