Google Ad
Editor Choice india

Karnataka : धक्कादायक – चालत्या बसला अचानक भीषण आग, ५जणांचा होरपळून मृत्यू , २७ जण जखमी

महाराष्ट्र 14 न्यूज : कर्नाटक मधील विजयदुर्गमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खाजगी चालत्या बसने अचानक पेट घेतल्याने ५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. तर यामध्ये २७ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एका बाळाचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे एका खासगी बसला अचानक भीषण आग लागली. ही बस बंगळुरूहून विजयापुराकडे जात असताना चित्रदुर्ग महामार्गावर बसला आग लागली. या आगीत एका बाळासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर २७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बसने पेट घेतला त्यावेळी बसमध्ये जवळपास ३२ प्रवासी होते.

Google Ad

मृतांमध्ये दोन लहान मुलं आणि एक महिलेचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, इंजिनला आग लागण्याचे कारण सांगितले जात आहे. हिरियूरच्या एसपी राधिका यांनी अपघाताची माहिती घेतली. जखमी झालेल्या २७ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!