Google Ad
Editor Choice Maharashtra

Jejuri : जेजुरीत सोमवती यात्रेनिमित्त कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू … १२ ते १४ डिसेंबरपर्यंत भाविकांसाठी बंद!

 

महाराष्ट्र 14 न्यूज : उभ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच श्रींचा पालखी सोहळासुद्धा रद्द करण्यात आलाय. तसेच जेजुरी शहरात भाविकांना प्रवेश नसून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार कलम 144 नुसार जेजुरीत जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय.

Google Ad

12 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंदी राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी प्रशासनाच्या आदेशानुसार 12 ते 14 डिसेंबरच्या काळात जेजुरीत येणे टाळावे, असे आवाहन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि मार्तंड देवस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे यांनी केले आहे.


सोमवती यात्रेनिमित्त सोन्याच्या जेजुरीत जमावबंदी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रकोप हळूहळू वाढताना पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द केली आहे. दरवर्षी हजारो भाविक जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रेसाठी येत असतात, अशातच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या यात्रेवर आता बंदी घालण्यात आली आहे.

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!