Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

उडान दिव्यांग फाउंडेशनचे उद्घाटन … दिव्यांगना आत्मनिर्भर करण्यासाठी उडान दिव्यांग फाउंडेशनची स्थापना … अध्यक्ष आनंद बनसोडे

महाराष्ट्र 14 न्यूज : वीर सावरकर भवन निगडी प्राधिकरण येथे उडान दिव्यांग फाउंडेशनचे उदघाटन मा. उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी संभाजी येवले समाज विकास अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, सामाजिक कार्यकर्ते दिनेश श्रीवास, शेखर काटे , दिपक भोजने प्रहार संघटनेचे अध्यक्ष दत्ता भोसले उपाध्यक्ष रवींद्र वाकचौरे उपस्थितीत होते.

यावेळी तुषार हिंगे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून शक्य होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले महानगरपालिका समाज विकास अधिकारी श्री संभाजी येवले यांनी मनोगतात पालिके तर्फे राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली व पालिका लवकरच अपंग भवन उभारणार आहे प्रस्तावना करताना संघटनेचे अध्यक्ष श्री आनंद बनसोडे म्हणाले की फाउंडेशनचा मुख्य उद्देश दिव्यांगना आत्मनिर्भर करणे त्याकरिता उडान दिव्यांग फाउंडेशनची स्थापना केली .

Google Ad

कोरोना काळात तुषार हिंगे माजी उपमहापौर यांनी केलेल्या कार्याबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांगा मार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दिव्यांगांना काठ्या, कुबड्या व सॅनिटायझर चे वाटप केले. यावेळी दिपक भोजने , रविंद्र वाकचौरे, विनोद चांदमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव बाळासाहेब तरस, रवी भिसे, योगेश सोनार , हरेश्वर गाडेकर , मोहम्मद शफी पटेल , शिवाजी पवार यांनी सहकार्य केले. तसेच कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन करून भूषण इंगळे यांनी सर्वाची मने जिंकली.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!