Google Ad
Articles Pimpri Chinchwad

कष्टाने शून्यातून विश्व निर्माण करणारे … ‘अरुण पवार’ यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार प्रदान!

महाराष्ट्र 14 न्यूज : उद्योग नागरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील एक साधा सेंट्रीग कॉन्ट्रॅक्टर ते आजचा उत्कृष्ट उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले, तसेच सामाजिक, अध्यात्मिक, पर्यावरण संदर्भातील कार्यात अग्रेसर असणाऱ्या ‘अरुण पवार’ यांना मुंबई येथील छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच यांच्या तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

रोहाना भवन मुंबई येथे आयोजित समारंभात हा पुरस्कार मुंबईचे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस राज खतीब, अमित गडांकुश, पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे यांच्या हस्ते अरुण पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपवरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार भोगळे, संभाजी माने, अरूण पिसाळ, सिहान बोरा, गिरीश जाधव, नगरसेवक रामदास पवळे, अपर्णा पाटील, सौरभ शिंदे, राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

Google Ad

कष्ट करण्याची तयारी असेल, तर प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय गाठता येते. असेच काही ‘अरुण पवार’ यांच्या बाबतीत घडले. परिस्थिती नसतानाही मराठवाड्यातील एका छोट्या गावातून पुणे शहर हा प्रवास म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे अरुण पवार, अशा शब्दात आयोजकांनी अरुण पवार यांचा गौरव केला.

‘अरुण पवार’ यांनी अध्यात्मा बरोबरच भंडार डोंगर तसेच आपल्या गावी वृक्षारोपणचे महान असे कार्य केले आहे, ते नुसतेच झाडे लावत नाहीत तर त्यांची पोटच्या पोराहूनही अधिक काळजी घेतात. वृक्षारोपण करणे, पाणी देऊन ते वृक्ष जगवणे आणि त्यांना हवे ते पुरवणे हाच त्यांच्या आयुष्याचा उद्देश आहे. आपल्या या झपाटलेपणातून त्यांनी अनेक झाडे वसवली आहेत. हे वृक्ष म्हणजे आज प्राण्यांसाठी हक्काचा अधिवास बनली आहेत. कोरोनाच्या महाभयंकर अशा संकट काळात गोरगरिबांना त्यांनी मोलाची मदत केली.

कष्ट करण्याची तयारी, प्रामाणिकपणा आणि चिकाटी, अशा गुणांचे दर्शन ‘अरुण पवार’ यांच्या कार्यातून होत असते. आजच्या काळातही या गुणांना वेगळ्या प्रकारे उजाळा देऊन आपले समाजकार्य या पटलावर उज्वल करणारे त्यांचे कार्य आहे. ज्यांनी आपल्या त्याग, करुणा आणि कष्टातून सर्वसामान्यांना आपले केले आहे. हे करत असताना बांधकाम क्षेत्रातही लावलेल्या छोट्याशा रोपट्याने वृक्षाच्या रूपाने उंच भरारी घेतली आहे. आज अनेक ठिकाणी त्यांचा हा व्यवसाय नावारूपाला आला आहे, आजच्या या पुरस्काराने त्यांनी आपल्या कामातून व समाजकार्यातून सर्वांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. त्यांची ही चाललेली धडपड निश्चितच समाजाकरीता कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

412 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!