Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौक, बॅडमिंटन हॉल समोरील रस्त्यावरील अपघातात … कु. निरंजन अनिल हिरवे याचे दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ नोव्हेंबर) : कुमार निरंजन अनिल हिरवे वय १७, रा. गांगार्डे नगर, पिंपळे गुरव याचे अपघाती दुःखद निधन झाले. शिवाजी मराठी विद्यालय कॉलेज, औंध येथे बारावी सायन्समध्ये शिकत होता. दापोडी येथील एस टी वर्क शॉपमध्ये शासकीय खात्यात कार्यरत असणारे अनिल तुळशीराम हिरवे यांचे ते चिरंजीव होते. त्याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण असा परिवार आहे.

काटेपुरम चौक येथील बॅडमिंटन हॉल समोरील रस्त्यावर शनिवार (दि. २६) रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास अपघात झाला. निरंजन हिरवे हा रामकृष्ण चौक येथून काटेपुरम चौकाच्या दिशेने दुचाकीवरून येत असताना बॅडमिंटन हॉल समोरील रस्त्यावर हा अपघात घडून आला. नागरिकांनी तत्परता दाखवत कृष्णा चौक येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सांगवी पोलीस बिट मार्शल काही वेळात घटनास्थळी दाखल झाले होते. अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

Google Ad

निरंजन हिरवे याचे रविवारी पहाटे पाच वाजता निधन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरताच पिंपळे गुरव परिसरात सर्वत्र शोककळा पसरली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!