Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

बोगस एफडीआर प्रकरणी ७ दिवसात कारवाई न केल्यास पुढील स्टँडिंग कमिटीची बैठक होऊ देणार नाही … स्थायी समिती सदस्य शशिकांत कदम यांची आयुक्तांकडे मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कामे मिळवताना खोटी कागदपत्रे ( FDR ) सादर करून महापालिकेची कामे मिळवणा – या ठेकेदारांवर पालिकेकडून कठोर कारवाई करवी, अशा मागणीचे पत्र ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांनी जानेवारी २०२० मध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तांना दिले होते, परंतु त्या पात्राची दखल न घेतल्याने व चौकशीस विलंब केल्याने, आशा १८ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल करण्याची मागणी आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्थायी समिती सद्स्यशशिकांत कदम’ यांनी पालिका आयुक्तांना केली आहे .

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील विविध विकासकामांसाठी वेगवेगळ्या ठेकेदाराकडून निविदा मागवल्या जातात . यामध्ये स्पर्धा होऊन निविदा भरली जाणे अपेक्षित असते, त्या निविदेतील एखादे काम मिळवण्यासाठी ( ठेकेदार ) कंत्राटदाराला अनामत सुरक्षा ठेव ( FDR ), बँक हमीपत्र अशी अनेक कागदपत्रे निविदा भरताना सादर करावी लागतात . यामध्ये महानगरपालिकेचे अनेक विभाग येतात, मात्र अनेक विभागात , विशेषत : स्थापत्य विभागातील कामांमध्ये बनावट कागदपत्रांचा सर्रास वापर झाल्याची बाब उघड होऊन आरोप झाले, आर्थिक सुरक्षेसह आवश्यक पात्रता निकषात बसत नसतानाही कामे मिळाल्याचे यात दिसून आले आहे.

Google Ad

यात १८ ठेकेदारांनी मिळून १०८ कामे घेतली असल्याची बाब नुकतीच पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली असून महानगरपालिकेची फसवणूक झाल्याने या फसवणूक करणा – या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकुन त्यांच्यावर फौजदारी खटले देखील दाखल करावेत आणि ठेकेदार आणि त्यांना मदत करणा – या संबधित अधिका – यांवर येत्या सात दिवसात कारवाई कारवाई अशी मागणी प्रभाग क्रमांक २९ नगरसेवक तसेच स्थायी समिती सदस्य शशिकांत कदम यांनी आज झालेल्या स्थायी च्या बैठकीत केली असून तसे त्यांनी आयुक्तांना सांगितले आहे , तसेच कारवाई न झाल्यास पुढील स्थायी समितीची मिटिंग होऊ देणार नाही असेही ते म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!