Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

मी कुणाच्याही दबावाला जुमानत नाही … पिंपरी चिंचवडमध्ये कृष्ण प्रकाश यांच्या ‘ दबंग ‘ एन्ट्रीने अनेकांचे धाबे दणाणले!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराकडे राज्याचे औद्योगिक आणि आयटी हब म्हणून पाहिले जाते. त्यामुळे यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असू शकतात. माथाडींच्या नावाखाली चालणारी गुंडगिरी मोडून काढली जाणार आहे. मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही, असं पिंपरी-चिंचवड शहराचे नविन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

५ सप्टेंबर शनिवारी कृष्ण प्रकाश यांनी आपला पदभार स्वीकारला. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. शहरात ९९ टक्के लोक कायदा पाळतात तर १ टक्का लोक कायद्याचे पालन करत नाहीत. या एक टक्का लोकांमुळे गुन्ह्याला चालना मिळवून ते घडले जातात. या प्रकारच्या लोकांनी हे लक्षात ठेवावे की, कायदा सर्वांसाठी सारखा असून, मी कोणत्याही दबावाला जुमानत नाही, असं कृष्ण प्रकाश म्हणाले.

Google Ad

शहरात कायद्याचे पालन करणारे अनेकजण आहेत, मात्र काही मोजके गुन्हेगार, व्हाईट कॉलर गुन्हेगार, लँड माफिया यांनी कायद्याचे उल्लंघन करत गुन्हेगारी वाढवली आहे, अशा सर्वांनी मी आहे तो पर्यंत दुसरा उद्योग बघावा, अन्यथा मी आहेच, अशा शब्दात नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी गुन्हेगारांना इशारा दिला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सर्व सामान्यांसाठी मी २४ तास उपलब्ध आहे. कुणाला काही अडचण असेल तर नागरिकांनी मला मेसेज करावा, असं आवाहन कृष्ण प्रकाश यांनी यावेळी केलं तसेच शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘झिरो टॉलरन्स’ कार्यपद्धत राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. शहरात यापुढे अवैध धंदे चालणार नाही.जे कायद्यात बसते ते जरूर करावे, कायदा मोडणाऱ्यांची पोलीस कंबर मोडतील. माझ्या पगारात मी समाधानी आहे, माझी कुठेही बदली केली तरी माझा पगार तेवढाच राहणार आहे, असं ते म्हणाले.

मी ज्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणचा मी पहिला पूर्ण अभ्यास करतो. त्यामुळे मला दोन दिवस द्या, मला अभ्यास करू द्या, माझ्या सर्व अधिकाऱ्यांशी ‘वन टू वन’ बोलू द्या, त्यांच्या समस्या जाणून घेऊन द्या. मग मी दोन दिवसानंतर शहर साफ करण्याचे काम सुरु करतो, असंही कृष्ण प्रकाश म्हणाले. यामुळे शहरातील भल्या भल्या गुन्हेगारांचे धाबे आता दणाणले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!