Google Ad
Editor Choice

हिंजवडीच्या बाटा शोरूच्या मॅनेजरची करामत … व्हीडीओ कॉलकरून रेकॉर्डींग करून, ब्लॅकमेल करून मुलींना धमकी … मनसेने केला भांडा फोड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० नोव्हेंबर) : पिंपरी चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेकडे सांगवी कार्यालयात लेखी तक्रार आली होती. शोरूमचा मॅनेजर महंमद हाफीजउददीन अली वय ३४ रा. साखरेवस्ती हिंजवडी पुणे मुळ रा. हाटटा माणाइंन्खोल हा मुलींचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत आहे. यावं त्वरित महंमद अल्ली आफीस उद्दील विक्रूत नराधमाला याच्यावर ३५४ गुन्हा दाखल करून मनसे स्टाईलने ताब्यात व पोलीसांना देऊन गजाआड करण्यात आले.

आत्तापर्यत हा नराधम १/१/२०२० ते १५/११/२०२२ पर्यत जवळपास ४० मुलींना मानसिक त्रास व व्हिडिओ कॅाल करून ब्लॅकमेल शारीरिक संबंध इतर मागणी करत होता, अॅडव्हॉन्स घेतलेले पैसे परत कर नाहीतर मी सांगेल तसे कर असे सांगुन, व्हीडीओ कॉलकरून शरीर दाखवि सांगुन त्याचे रेकॉर्डींग करून, ब्लॅकमेल करून घाण स्पर्श केला तसेच फिर्यादीची बहीण हीला फिर्यादीचा व्हिडिओ दाखवुन छातीस घाण स्पर्श केला व फिर्यादीची मैत्रिण हीलाही फिर्यादीचा व्हीडीओ दाखविला असे मुलींच्या तक्रारीतुन समजले. दोन वर्ष तक्रारीसाठी कोणतीही मुलगी पुढे येत नव्हती तसेच याबाबत काहीच दिवसांपूर्वी मुली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्या ५ तास बसवून ठेवले पंरतू तक्रार घेतली नाही.

Google Ad

त्यामुळे दोन मुली दोन दिवसांपूर्वीच सांगवी मनसे कार्यालयात येऊन समक्ष तक्रार सांगितली व लेखी तक्रारही दिली यावेळी सोबत मनसेचे सुरेश सकट (पिंपळे गुरव उपविभाग अध्यक्ष) उपस्थित होते. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांकडून हि तक्रार पिं.चिं.मनसे महिला सेनेकडे कळवली व लगेच काल (१९ नोव्हेंबर) ११ः०० वाजता थेट हिंजवडी पोलीस ठाणे येथे थेट हिंजवडी पोलीस ठाण्याचे विवेक मुगळीकर यांची भेट घेतली व मनसे पदाधिकारी व तक्रारदार दोन्ही मुलीशी सविस्तर चर्चा झाली. यावेळी मनसेने FIR करून गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली मुगळीकर यांनी चांगले सहकार्य केले त्वरित गुन्हा दाखल करून घेतला, असेही मनसेच्या वतीने सांगण्यात आले.

हिंजवडी पोलीस ठाणे येथून मनसेचे सर्व पदाधिकाऱ्यांची फौज महिलासहित थेट हिंजवडी बाटा शोरूमला रवाना होऊन येथिल शोरूमच्या सर्व मुलींना महिला पदाधिकारी भेटल्या चौकशीही केली समजाऊन सांगितले कोणत्याही मुलीला त्रास झाला तर त्यांना फोन नंबर देऊन समक्ष आम्हाला संपर्क करण्याचे आवाहन मनसे पदाधिकारी यांनी केले.

नंतर या आरोपी मॅनेजरला मनसे स्टाईलने ताब्यात घेतले व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला व कळवले आम्ही आरोपीला पकडून ठेवले आहे त्वरित पोलीसांना पाठवा पाच मिनटातच पोलीस हजर झाले व आम्ही पोलीसांच्या ताब्यात दिले पोलीसांनाही गुरकत असतांना पोलीसांनीही त्यांचा पोलीसी खाक्या दाखवला व ताब्यात घेतला पुन्हा मनसेचा ताफा हिंजवडी पोलीस ठाणे आरोपीची सविस्तरतपासणी, माहिती, मोबाईलमधिल माहिती घेऊन अटक केली आहे. अधिक तपास सपोनि गोमारे करत आहेत.

यावेळी मनसेचे श्री.राजू सावळे (पिं.चिं.शहर उपाध्यक्ष) सुरेश सकट (पिंपळे गुरव उपविभाग अध्यक्ष) विशाल सांळूके (काळेवाडी उपविभाग अध्यक्ष) तसेच महिला सेनेच्या सौ.अश्विनीताई बांगर(शहर अध्यक्षा),सौ.अनिताताई पांचाळ(शहर उपाध्यक्षा)सौ.अनिताताई पाटील आकाश पांचाळ (शहर संघटक मनविसे) इत्यादी पदाधिकारी कार्यकरते उपस्थित होते.हिंजवडी पोलीस ठाणे याच्याकडून पुढील सविस्तर तपास चालू आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement