Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीमार्फत क्लीनिक ऑन क्लाऊड मशीनवर आरोग्य तपासणीस पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते प्रारंभ

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर आयुक्तालयातील ४१२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये ४८ अधिकारी आणि ३६३ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एका पोलीस हेड कॉन्स्टेबलचा ३० ऑगस्ट रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील ४३ अधिकारी आणि ३१६ कर्मचारी कोरोनामुक्त देखील झाले आहेत. सध्या ५ अधिकारी आणि ४७ कर्मचाऱ्यांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांचा जनतेशी थेट संबंध येत असल्याने कोरोनाचा पोलिसांना अधिक धोका आहे.

त्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी खबरदारी घ्यावी लागत आहे. कोरोनाची खबरदारी घेणे, प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्था पाळणे ही तिहेरी कसरत पोलिसांना करावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीमार्फत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीसांकरिता क्लीनिक ऑन क्लाऊड मशीनवर आरोग्य तपासणीस पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला . सदर कार्यक्रमास एचएएलचे डीजीएम श्री.सी.व्ही.पुरम , अनुज कुमार सिंह हे उपस्थित होते .

Google Ad

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!