Google Ad
Editor Choice

गुजरात निवडणूक…पंतप्रधानांनी केले मतदान

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५  डिसेंबर) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी 93 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात 14 मध्य आणि उत्तर जिल्ह्यांतील 93 जागांवर मतदान होत आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राणीप येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान केले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) यापैकी 51 जागा जिंकल्या. काँग्रेसला 39, तर अपक्ष उमेदवारांनी तीन जागा जिंकल्या. मध्य गुजरातमध्ये भाजपने 37 जागा जिंकल्या. काँग्रेसला 22 जागा मिळाल्या. पण उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसला 17, तर भाजपला 14 जागा मिळाल्या. गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत. सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला मतदान झाले. पहिल्या टप्प्यात सरासरी 63.31 टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील election निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानेही तयारी केली आहे. विविध मतदान केंद्रांवर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या उर्वरित 93 जागांसाठी 61 राजकीय पक्षांचे 833 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ सर्व 93 जागांवर लढत आहे. काँग्रेस 90 जागांवर निवडणूक लढवत असून त्यांचा मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर उमेदवार उभे केले आहेत. राज्य निवडणूक मंडळानुसार उमेदवारांमध्ये 285 अपक्षांचाही समावेश आहे.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!