Google Ad
Editor Choice Pune

Pune : पहिल्या मानाचा कसबा गणपतीचे झाले विसर्जन … भक्तीभावाने आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप … प्रशासनाने केली जय्यत तयारी!

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यभरात भक्तीभावे पुजा केल्यानंतर लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जात आहे. यासाठी प्रशासनाने विसर्जन हौदांची व्यवस्था करत जय्यत तयारी केलेली दिसतेय. यावर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने झालेल्या या उत्सवाचा निरोपही त्याच पद्धतीने करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. प्रशासनाने ठिकठिकाणी फिरत्या हौदांची व्यवस्था केलीय. पुण्यात या आवाहनाला प्रतिसाद देत 85 टक्के लोकांनी आपल्या बाप्पांना संसर्गाचा धोका वाढणार नाही याची खबरदारी घेत निरोप दिला.

पुण्याचा मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीचे विसर्जन, आकर्षक फुलाने सजवलेली ‘श्रीं’ची पालखी, गणेश मंडळाने गणपती समोरील मयूर कुंडात लाडक्या बाप्पाचा विसर्जन

Google Ad

पुण्याचा मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जनला सुरुवात, मंडपातून श्रीची मूर्तीचं जवळच असलेल्या कृत्रिम हौदाकडे प्रस्थान
राज्यात ठिकठिकाणी गणेश भक्तांकडून बाप्पांना भावपूर्ण निरोप, पुण्यातील पहिल्या मानाचा कसबा गणपतीचे विसर्जन :- पुणेकरांचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात, परंपरेनुसार महापौरांकडून कसबा गणपतीला हार घालून आरती करण्यात आली. पुण्यातील कसबा गणपतीच्या विसर्जनासाठी महापौर मुरलीधर मोहोळ पोहचले, आमदार मुक्ता टिळकही उपस्थित पुण्यातील मानाच्या गणपतीसह दगडूशेठ गणपतीही मंदिरातच विसर्जित होणार, रात्री 11 पर्यत सर्व गणपती विसर्जन पार पडणार, पोलिसांकडून नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन, जवळपास 7 हजार पोलीस शहरात विविध ठिकाणी बंदोबस्ताला आहेत.

पुणेकरांचा पाचवा मानाचा गणपती अर्थात केसरीवाडा गणपतीचे 2:30 वाजता विसर्जन होणार, केसरीवाडा गणपतीचे उत्सव मंडपातच विसर्जन होणार, सभामंडपात रांगोळीच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांची मास्क घातलेली प्रतिमा साकारली, विसर्जनासाठी कसबा गणपती मंदिराबाहेर सुंदर रांगोळी काढलीआहे.
पुणेकरांचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीचे सकाळी 11:30 वाजता विसर्जन होणार, त्याआधी परंपरेनुसार महापौर 10:30 वाजता कसबा गणपतीला हार घालणार, पहिल्या मानाच्या पाठोपाठ इतर 4 मानाच्या गणपतींचे विसर्जन केले जाणार, यंदा सर्व गणपतींचे उत्सव मंडपातच विसर्जन केले जाणार आहे.

पुण्यातही ‘आपल्या बाप्पाचं, आपल्याच घरी विसर्जन’ या आवाहनाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. पहिल्या नऊ दिवसांमध्येच जवळपास 85 टक्के प्रतिसाद मिळाला. गणेश विसर्जनासाठी यंदा 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 191 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली. या 10 दिवसांमध्ये फिरत्या हौदांमध्ये 20,540 मूर्ती विसर्जन आणि संकलन केंद्रावर 24 हजार 13 मूर्ती संकलन असे एकूण 44 हजार 553 गणेश विसर्जन झाले आहे. या वर्षी 9 दिवसांत एकूण 31 हजार 110 किलो निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही पुणेकरांना घरच्या घरीच बाप्पाला निरोप द्या असं आवाहन केलंय.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

80 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!