Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

गणेशोत्सव २०२० : गणपती मंडळांसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने जाहीर केली आचारसंहिता … काय आहेत? नियम, अटी!

महाराष्ट्र 14 न्यूज : गणेशोत्सव २०२० गणपती मंडळासाठी आचारसंहिता :-
दिनांक २२/०८/२०२० ते दिनांक ०१ / ० ९ / २०२० रोजी पर्यंत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात कोरोना विषाणु प्रार्दुभावाचे पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घालुन दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनूसार गणेशोत्सव साजरा होणार आहे . कोरोना विषाणुचा संसर्ग जागतिक आजार घोषीत करण्यात आलेला आहे . पिंपरी चिंचवड मधील कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेता काही कठोर निर्णय घेणे भाग आहेत . त्यानुसार मागील सहा महिन्यात धार्मिक , सामाजिक व उद्योग व्यवहारात अनेक बंधने अंमलात आणली गेली . परंपरांना मुरड घालत वर्षानुवर्ष साजरे होणारे उत्सव आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशांप्रमाणे साजरे करीत असताना प्रत्येकाची भावना जपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे .

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे पार्श्वभूमीवर गणेश मंडळ , लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकान्यांची बैठक आयोजित केली होती . सार्वजनिक आरोग्याचे प्राधान्य लक्षात घेता त्यातील निर्णयांना सर्वानी सकारात्मक समर्थन दिले . त्यानुसार महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेला पिंपरी चिंचवड मधील गणेशोत्सव साध्या स्वरूपात साजरा करण्यावर सर्वांचे एकमत झाले असुन त्याकरीता खालील आचारसंहिता प्रस्तावित केली आहे .

Google Ad

अ ) गणेश मुर्ती खरेदी :-
१)यावर्षी गणेश मुर्तीची खरेदी मंडळांनी / नागरिकांनी शक्य तो ऑनलाईन पध्दतीने करावी . मनपा कड़न क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील शाळांची पटांगणे , मोकळ्या जागांवर गणेश मुर्ती विक्रीकरीता परवानगी दिली जाईल . यावर्षी गणेश मुर्ती विक्री स्टॉलला मनपाकडून रस्ता , पदपथांवर परवानगी दिली जाणार नाही .

२)श्री.गणेश आगमन :- यावर्षीच्या श्रीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत , अशा शासनाकडून मार्गदर्शक सुचना देण्यात आलेल्या असुन , तरी मिरवणूकी बाबत शासनाचे सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे . श्रींचे आगमन व विसर्जनाच्या विधीसाठी कमीत कमी लोक एकत्र जमतील .

क ) श्री गणेश प्रतिष्ठापना :-
ज्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मुर्ती ठेवण्याची जागा आहेत . त्यांनी श्री गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना त्याच ठिकाणी करावी . अनन्य साधारण परिस्थितीत म.न.पा.चे नियम व अटींचे पालन करून मंडळास छोटया मंडपा करीता परवानगी दिली जाईल . गणेशोत्सव -२०२० संबंधाने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांन्वये श्री गणेशाचे मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरीता ०४ फूट व घरगुती गणपती ०२ फूटाच्या मर्यादेत असावी .
पिंपरी चिंचवड महानगपालिकेने घोषित केलेल्या कंन्टेनमेन्ट झोनमध्ये ( प्रतिबंधात्मक क्षेत्रात ) सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना परवाणगी देण्यात येऊ नये .

ड ) श्री गणेश पुजा :-
श्री च्या आरती व पुणेकरीता जास्तीजास्त ०५ व्यक्तीच हजर राहतील , श्री गणेशाचे परंपरागत विधी योग्य ते पावित्र्य राखून करावेत . सदर वेळी सॅनिटायझर , मास्क व सोशल डिस्टसिंग पाळणे अनिवार्य राहील . श्री गणेशाचे मुती ठिकाणी गर्दी होईल असे उपक्रम टाळावेत . अनन्यसाधारण परिस्थिती लक्षात घेता गणेश पुजन व इतर आरती ही मंडळाचे कार्यकर्त किंवा मंदिराचे पुजारी यांनीच करावी , बाहेरील व्यक्तींना त्यात सहभागी करून घेऊ नये . श्रध्देचा विषय असुनही सध्याच्या अनन्यसाधारण परिस्थितीत दर्शन / पूजा याकरीता दृकश्राव्य / डिजीटल माध्यमांचा वापर करावा .

इ )श्री गणेश दर्शन :-
इ ) श्री गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन , केबल नेटवर्क , वेबसाईट व फेसबुक इ . व्दारे उपलब्ध करून देण्याबाबत मंडळांने जास्तीजास्त प्रयत्न करावा . ऑनलाईन व्यवस्था करता येत नसल्यास गणेश दर्शनासाठी छोटे छोटे व्हिडीओ बनवून ते संबंधितांना पाठवावेत . चांगल्या व्हिडीओसाठी प्रशासनाकडून बक्षिस देण्याची योजना ठेवण्यात येईल . गणेश मंडळांनी दर्शनाकरीता ऑनलाईन टोकन , डिजीटल पास सुविधा वेळेची मर्यादा ठेवावी . सामाजिक अंतराचे नियमाचे उल्लघंन होणार नाही याची दक्षता घ्यावी . दर्शनला येणा – या भावीकासाठी थर्मल गन , ऑक्सीमीटरची व्यवस्था करुन चेकिंग करण्यात यावे . कोणाही निमंत्रितांना अगर व्हीआयपीना दर्शनाला परवानगी अगर निमंत्रित करण्यात येऊ नये . परिस्थिती गंभीर व अनन्य साधारण असल्याने ज्याप्रमाणे पंढरपूर वारीचे वेळी लोकांनी घरातूनच श्री.विठ्ठलाचे दर्शन घेतले . त्याप्रमाणे श्री गणेशाचे घरातूनच दर्शन घ्यावे .

परिसर :-
गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळाबाहेर फुलांचे हार / नारळ / मिठाई / प्रसाद इत्यादी दुकाने लावण्यास मनाई आहे . महत्वाच्या गणेश मंडळांनी सी.सी.टी.व्ही . कॅमेरे बसवावेत व त्यांचे रेकॉडींग करावे . गणेश मंडळांनी जाहिरात प्रदर्शनामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी . तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिरातीना प्राधान्य द्यावे . उत्सव कालावधीत रस्ता / पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना परवानगी देण्यात येणार नाही . अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास पुर्णपणे प्रतिबंध करण्यात यावा . रुग्णवाहीका , रिक्षा व अत्यावश्यक सेवेतील वाहने सहजपणे जाऊ शकतील एवढी मोकळी जागा ठेवणे आवश्यक राहील . ध्वनी प्रदूषण ( नियमन व नियंत्रण ) व नियम २००० मधील परिच्छेद ४ चे तरतुदीप्रमाणे रूग्णालय , शेक्षणिक संस्था , न्यायालय , दवाखाने यांचे सभोवताली कमीत कमी १०० मीटरचे परिसरात ध्वनी क्षेपकाचा वापर करू नये .

सांस्कृतिक व इतर कार्यक्रम :- गणेश मंडळाने या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने उत्सवाचे मांगल्य व पावित्र्य राखले जाईल अशा पध्दतीने करावा . संपूर्ण उत्सवाचे काळात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे .

उ ) यावर्षी उत्सवाचे स्वरूप उत्सवी नसेल परंतु त्यात पुर्णपणे मांगल्य जपले जाईल याकरीता मंडळांनी ऑनलाईन उपक्रम राबवावेत . त्याची प्रशासनाकडून योग्य ती नोंद घेण्यात येईल . आरोग्य विषयक मदत , विद्याथ्यांना , वृध्दांना व गरजूंना मदत तसेच आरोग्य विषयक प्रबोधनपर ऑनलाईन उपक्रम अनेक मंडळे करू इच्छितात . ते स्वागतार्ह आहेच परंतु स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा . त्यास योग्य त्या नियमात बसवून घरोघरी मदत पोहोचवून असे उपक्रम करण्याचे प्रयत्न करावेत , कोणीही त्यास समारंभाचे स्वरूप देऊ नये . उदा . वृध्दांना वस्तु वाटप करण्यासाठी त्यांना जमा करून समारंभ करणेस परवानगी असणार नाही . त्याऐवजी वृध्द गरजुंची यादी बनवून त्याचे सोशल डिस्टसिंग राखून , मास्कचा वापर इत्यादी प्रतिबंधात्मक काळजी घेऊन वाटप करून आवश्यकतेनुसार त्याचे फोटो काढ्न कार्यक्रम यशस्वी करावा . अनेक मंडळांनी एकमेकाशी समन्वय साधुन असे वाटप एकमेकाच्या मदतीने करणेचा प्रयत्न करावा ,

सुरक्षा :-
१) सर्व गणेश मंडळाचा हॉटसअॅप ग्रुप तयार करुन त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन सुचना दयावेत . सार्वजनिक गणेशमंतीची जबाबदारी गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्यावर सोपवावी , मंडळाजवळ हजर स्वंयसेवक / कार्यकर्ते यांनी मद्यसेवन करु नये . मद्यसेवन केलेले व्यक्तीला मंडळाच्या मंडपा जवळ येण्यास प्रतिबंध करावा . तसेच कोणत्याही प्रकारचा जुगार खेळु नये . कार्यक्रमाच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजना उपलब्ध केलेली असावी . वाळुच्या बादल्या भरून ठेवाव्यात . काही अनोळखी , संशयीत , बेवारस वस्तु उदा . सुटकेस , रेडिओ , मोठे घडयाळ , जेवणाचे डबे , सायकली वगरे आढळून आल्यास अगर संशयीत व्यक्ती , इसम जवळपास फिरतांना रेंगाळतांना दिसल्यास ताबडतोब पोलीसाना कळवावे . सदर बाबत संयोजकांनी स्वयंसेवक / कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करावे . गणेश मुतीच्या अंगावर मोल्यवान दागिने असणा – या गणेश मंडळांनी संरक्षणाची विशेष काळजी घ्यावी . श्री च्या मुर्तीचे संरक्षणाकरीता मंडळाचे कमीत कमी ५ कार्यकर्ते अथवा खाजगी सुरक्षा रक्षक २४ तास हजर राहतील याची दक्षता घ्यावी तसेच गर्दी टाळावी .

ए ) कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना :
१) कोविड -१९ साथ रोगाच्या पार्श्वभुमीवर केंद्र शासन / राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील . कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी , व्यक्तींमध्ये भोतिकदृष्ट्या कमीत कमी संपर्क येईल याची दक्षता घ्यावी . शासनाने कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केलेल्या ठिकाणाच्या गणेशोत्सव मंडळांनी प्रतिबंधीत क्षेत्रास लागू असलेल्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे . गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक आहे . तसेच गणेशोत्सव कालावधीत गणपती मंडळांनी त्यांच्या मंडळास भेटी दिलेल्या व्यक्तींची नावे , मोबाईल क्रमांक , पत्ता , आरोग्य सेतू अॅप इत्यादी बाबतची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवणे बंधनकारक आहे . जेणेकरून यदाकदाचित संशयीत रुग्ण आढळल्यास कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे सोयीचे होईल . कोविड -१ ९ साथरोगामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव हा साधेपणाने व देखावे न करता साजरा करावा तसेच गणेशोत्सवाच्या वेळी सामाजिक अंतर राखणे ,

कोविड -१ ९ साथरोगामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा गणेशोत्सव हा साधेपणाने व देखावे न करता साजरा करावा तसेच गणेशोत्सवाच्या वेळी सामाजिक अंतर राखणे , मास्क लावणे , सॅनिटायझरचा वापर करणे . आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे . श्री गणेशाची आरती करताना आरतीचे ताट व प्रसादाचे ताट अनेक व्यक्तीकडून हाताळले जाणे टाळावे . आरती करणेपुर्वी व प्रसाद वाटपाच्या पूर्वी ताट संनिटायझरने सनिटायझ करून घेणे . तसेच हाताळण्या व्यक्तीने सॅनिटायझरचा वापर करावा . जेणेकरून विषाणुचा संसर्ग टाळणे शक्य होईल . मंडळांनी मंडपामध्ये संनिटायझोशन करीता सोडीयम हायपोक्लोराईड किंवा इतर निरजंतुकीकरण करण्याची साधने ठेवावीत तसेच छोटा स्प्रे पंपाच्या किंवा सरफेस सनिटायझरच्या सहाय्याने वारंवार स्पर्श होणारी ठिकाणे फवारणी करून सॅनिटायझेशन करावे . मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना विषाणु संसर्गाबाबत सजग राहून उत्सहाच्याभरात कोणाशीही हस्तांदोलन न करता दुरूनच नमस्कार करावा .

श्रीगणेश विसर्जन :-
१)या वर्षी पुजेचे मुर्तीचे विसर्जन मंडपालगतच विधीवत करावे . विसर्जनाकरीता मिरवणूक काढता येणार नाही . विसर्जनाकरीता गर्दी होऊ नये म्हणुन नदी पात्रात विसर्जन घाटांचे व होदांचे व्यवस्था करणार नसलेबाबत मनपाने घोषणा केली आहे . त्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून विसर्जन घाटावर पक्के बँरीकेटींग करुन घ्यावे व त्याबाबत मंडळांना सुचित करावे . श्री गणेशाची मुर्ती विसर्जनाकरीता मंडळाने मंडपाचे शेजारी कृत्रिम होदाची निर्मिती ( टब / बॅरल ) करून त्यामध्ये श्री गणेशाचे मुर्तीचे विसर्जन करावे . विसर्जनाच्या वेळी गर्दी न करता कमीतकमी लोक हजर राहतील याची दक्षता घ्यावी .

 

मिरवणूक , अन्नदान , महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमातून होणाऱ्या गर्दीला टाळण्याकरीता सदर बाबींना पुर्णतः मनाई आहे . घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन नागरिकांनी घरच्या घरी करावे . विसर्जन करण्यात आलेल्या गणेश मुर्ती व निर्माल्य हे मनपाच्या वाहनामधून घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे . ध्वनी प्रदुषणा बाबतीतील सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटी व शर्थीचे काटेकोर पालन करावे . महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग , ध्वनी प्रदुषण ( नियमन व नियंत्रण ) नियम २००० च्या अंमलबजावणीबाबतचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांचे कार्यालय ( गृह शाखा ) क्र . पगक / कावि / १०५१ / २०२० , दिनांक १४/०२/२०२० अन्वये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक सकाळी ०६.०० वा . ते रात्री १२.०० वा . निश्चित केलेले दिवस खालील प्रमाणे दिनांक २६/०८/२०२० पाचवा दिवस , दिनांक २८/०८/२०२० सातवा दिवस दिनांक ३१/०८/२०२० दहावा दिवस व दिनांक ०१ / ० ९ / २०२० अनंत चतुर्दशी रोजी पर्यंत ध्वनी क्षेपकाचा सकाळी ०६.०० ते रात्री १२.०० वा पर्यंत वापर करता येईल .
इतर दिवशी ध्वनी क्षेपकाचा वापर सकाळी ०६.०० ते रात्री १०.०० वा . पर्यंतच करावा, घ्यावे व त्याबाबत मंडळांना सुचित करावे.

श्री गणेशाची मुर्ती विसर्जनाकरीता मंडळाने मंडपाचे शेजारी कृत्रिम होदाची निर्मिती ( टब / बॅरल ) करून त्यामध्ये श्री गणेशाचे मुर्तीचे विसर्जन करावे . विसर्जनाच्या वेळी गर्दी न करता कमीतकमी लोक हजर राहतील याची दक्षता घ्यावी . मिरवणूक , अन्नदान , महाप्रसाद इत्यादी कार्यक्रमातून होणाऱ्या गर्दीला टाळण्याकरीता सदर बाबींना पुर्णतः मनाई आहे . घरगुती गणपती व गौरीचे विसर्जन नागरिकांनी घरच्या घरी करावे . विसर्जन करण्यात आलेल्या गणेश मुर्ती व निर्माल्य हे मनपाच्या वाहनामधून घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे . ध्वनी प्रदुषणा बाबतीतील सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटी व शर्थीचे काटेकोर पालन करावे .

महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग , ध्वनी प्रदुषण ( नियमन व नियंत्रण ) नियम २००० च्या अंमलबजावणीबाबतचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांचे कार्यालय ( गृह शाखा ) क्र . पगक / कावि / १०५१ / २०२० , दिनांक १४/०२/२०२० अन्वये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक सकाळी ०६.०० वा . ते रात्री १२.०० वा . निश्चित केलेले दिवस खालील प्रमाणे दिनांक २६/०८/२०२० पाचवा दिवस , दिनांक २८/०८/२०२० सातवा दिवस दिनांक ३१/०८/२०२० दहावा दिवस व दिनांक ०१ / ० ९ / २०२० अनंत चतुर्दशी रोजी पर्यंत ध्वनी क्षेपकाचा सकाळी ०६.०० ते रात्री १२.०० वा पर्यंत वापर करता येईल . इतर दिवशी ध्वनी क्षेपकाचा वापर सकाळी ०६.०० ते रात्री १०.०० वा . पर्यंतच करावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!