Google Ad
Editor Choice Health & Fitness Sports

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधीतून गांधी पेठ तालीम चिंचवड येथे … पाच लक्ष रुपयाचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीचे मॅटचा लोकार्पण सोहळा संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ जुलै) : गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज आमदार लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप यांच्या निधीतून गांधी पेठ तालीम चिंचवड, येथे पाच लक्ष रुपयाचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्तीचे मॅटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

सदर प्रसंगी गांधी पेठ तालमीचे विश्वस्त माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडीगेरी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे सभागृह नेते नामदेव ढाके, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे भारतीय जनता पार्टी चिंचवड मंडळाचे अध्यक्ष योगेश चिंचवडे गांधी पेठ तालमीचे पैलवान विपुल नेवाळे स्वीकृत नगरसेवक बिभीषण चौधरी, प्रसिद्ध उद्योजक संतोष कलाटे, टेल्को एम्प्लॉईज युनियनचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला.

Google Ad

सदर प्रसंगी बोलताना आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी निरोगी आयुष्याचा मंत्र म्हणून खेळाला खूप महत्त्व आहे, सर्वात जास्त खेळात ताकद लागते ते म्हणजे कुस्ती. कुस्तीचा खेळाडू हा ताकदवान असला तरी सर्वात जास्त विनम्र असतो तीच विनम्रता त्याला खेळाच्या माध्यमातून शारीरिक ऊर्जा देते आणि ध्यानाच्या माध्यमातून मानसिक ऊर्जा देण्यास मदत करते. देशी असलेल्या कुस्ती या खेळाचे महत्त्व सांगताना बलशाली शरीर आणि मन या दोघांचा उपयोग आपले संपूर्ण आयुष्य आरोग्यदायी जपताना नक्की होतो.

सदर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती मॅटचे लोकार्पण करताना उपस्थित सर्व गांधी पेठ तालमीतील मल्ल यांना शारीरिक परिश्रम करताना शरीर बळकट व पीळदार होते, त्याचबरोबर आपले सुंदर आणि चांगले व्यक्तिमत्वही निर्माण करण्याचा मंत्र दिला. सदर कुस्तीच्या मॅटचे उद्घाटन गांधी पेठ तालीमच्या दोन नव कुस्तीगारांची कुस्ती लावून करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे व समारोप व आभार प्रदर्शन श्री ज्ञानेश्वर शेडगे यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

41 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement