Google Ad
Maharashtra crimes

भागादारी देण्याचे व मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून २२लाखाची फसवणूक

महाराष्ट्र 14 न्यूज : थायलंड येथील थाई अ‍ॅक्वा कंपनीत भागादारी देण्याचे व मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून गुजरातमधील दोघांनी एकाची २२ लाख रुपयांची फसवणूक केली. हेमिन जसुभाई खोखर (रा. नाना वराछा, सुरत) आणि दिव्यांग कानुभाई डोबारीया ( रा. मोठा वराछा़ सुरत) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रकांत प्रभुदास ठक्कर (वय ५४, रा. विश्रांतवाडी) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१८ ते डिसेंबर २०१९ दरम्यान भोसरी एमआयडीसीमध्ये घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमिन आणि दिव्यांग यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. थायलंड देशातील बँकॉक येथील थाई अ‍ॅक्वा कंपनीचा भोसरी एमआयडीसीमध्ये कारखाना होता. या कंपनीत भागीदारी देण्याचे व मोठ्या नफ्याचे आमिष दाखविले.

Google Ad

त्यांना कंपनीत २२ लाख रुपयांची गुंतवणुक करण्यास भाग पाडले. कंपनीच्या नफा तोट्याचा हिशोब न देता तसेच कंपनीमध्ये गुंतवलेली रक्कमेची मागणी करुनही परत दिली नाही. परस्पर ही कंपनी बंद करुन कंपनीतील मशिनरी सुरत येथे घेऊन गेले. तेथे दुसरी कंपनी स्थापन करुन फिर्यादीची फसवणुक केली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!