Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Baramati : बारामती राजकीय नेत्यावर गोळीबाराने हादरल … राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर कसा झाला हल्ला?

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०१जून) : पुणे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज तावरे यांच्यावर सोमवारी दुचाकीस्वार व्यक्तींनी गोळीबार केला. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात माळेगाव येथे ही घटना घडली. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे.

बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना घडली आहे. रविराज तावरे हे पत्नी- जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासह सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

Google Ad

या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करुन पळ काढला होता. जखमी अवस्थेतील तावरेंना तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन रविराज तावरे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेतलं जाईल असंही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितलं.

एकूणच बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणाही कामाला लागली आहे. आता या प्रकरणात नेमकं मास्टरमाईंड कोण हे शोधणे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!