Google Ad
Editor Choice Maharashtra

Pandharpur : ३६ वर्षांच्या शिवसेनेच्या प्रवासात पहिल्यांदाच घड्याळाला मतं मागतोय … शिवसेनेचा फायरब्रैड नेता पंढरपूरच्या मैदानात!

महाराष्ट्र 14 न्यूज, १४ एप्रिल : शिवसेना नेते पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या सभेत जोरादार बॅटिंग केली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला. 36 वर्षाच्या शिवसेनेतील राजकीय प्रवासात पहिल्यांदा घड्याळला मत मागायची संधी मिळाली, असं ते म्हणाले. तर, खा त्यांचं मटण आणि दाबा आमचं बटन असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादीनं भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारार्थ सभा सुरु आहे.

आमचं आणि त्यांचं लव्ह मॅरेज

Google Ad

गुलाबराव पाटील यांनी 36 वर्षाच्या शिवसेनेतील राजकीय प्रवासात पहिल्यांदा घड्याळला मत मागायची संधी मिळाली, असं म्हटलं. यावेळी त्यांनी भाजपच आणि आमचं लव्ह मॅरेज होतं, असं देखील म्हटलं. मी जादुगार नाही संत नाही पण चेहरे चांगले ओळखतो, असं देखील ते म्हणाले.

35 ते 40 हजार मतांनी विजय

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरची जागा निवडून द्या, सरकार बदलतो, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा गुलाबराव पाटील यांनी शेरोशायरी करत फडणवीसांचा समाचार घेतला. शिवसेनेने आमच्या सारख्या छोट्या छोट्या लोकांना मोठं केलं. येत्या काळात मंगळवेढा टँकरमुक्त करणार असल्याचं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दिलं.

सत्यानाश होईल तुमचा

मेलेल्या माणसावर टीका करता तुमचा सत्यानाश होईल, अशी टीका पाटील यांनी विरोधकांवर केली. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये खा त्यांचं मटण आणि दाबा आमचं बटन असं आवाहन उपस्थितांना केलं. तुमची देण्याची ताकद आहे आमची घेण्याची आहे. ज्याच्या घरी जास्त चप्पल जोडे येतात तो खरा श्रीमंत असतो, असेही ते म्हणाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

19 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!