Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपळे सौदागर व पिंपरी ला जोडणारा पवना नदीवरिल नियोजित पुलाचे आज केंद्रिय मंत्री मा.प्रकाश जी जावडेकर यांच्या हस्ते ई – भूमीपुजन ‘

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपळे सौदागर ते पिंपरी च्या दिशेने जाणारा पवना नदीवरील २५ वर्ष जुन्या पुलालगत वाहतुकिसाठी नवीन पुल बांधण्यात यावा या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पने व सुचनेनुसार आणि नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे व नगरसेवक शत्रुघ्न बाप्पु काटे यांच्या पाठपुराव्यानुसार आज नवीन पुलाचे ई-भूमिपुजन करण्यात आले.

Google Ad


आज शनिवार दि.२७/२/२०२१ रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थी नागरीकांना घरे वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रिय मंत्री मा.प्रकाश जी जावडेकर साहेब यांच्या वतीने शहरातिल विविध कामांचे ई-भूमिपुजन करण्यात आले यावेळी आमदार. महेश दादा लांडगे,महापौर.ऊषा माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके,आयुक्त.राजेश पाटिल उपस्थित होते यावेळी पवना नदीवरील नियोजित पुलाचे संबंधित नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे यांच्या उपस्थिति मधे ई-भूमिपुजन करण्यात आले.


पाठपुराव्या च्या यादिमधे सर्वप्रथम ४/८/२०१७ रोजी महानगरपालिकेमधे पत्राद्वारे सदर पुलाची मागणी करुण स्थाई समिती च्या माध्यमातुन  साल २०१७-२०१८ साली स्थाई समिती सदस्य असताना नगरसेविका सौ.निर्मलाताई कुटे यांच्या पाठपुराव्यानुसार सदर पुलासाठी स्टुप कंपनी च्या माध्यमातुन कंसल्टंट नेमण्यात आले. तसेच तत्कालीन आयुक्त.श्रवण हार्डिकर साहेब यांच्या माध्यमातुन सदर जागेची पाहणी करुण कामास अडथळा निर्माण करणारया गोष्ठींची दख़ल घेण्यात आली, त्यामुळेच या पुलाचे काम मार्गी लागले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!