Google Ad
Editor Choice Maharashtra

राज्याच्या निर्णयातुन पिंपरी चिंचवड पुण्यासाठी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११एप्रिल) : राज्यासाठी जो निर्णय असेल तो घ्या, आमचा पाठिंबा राहिल. मात्र, राज्यासाठी जो निर्णय घ्याल, तो पुण्याला लागू करू नका, असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सर्वांचं ऐकूण जो निर्णय घ्याचा आहे तो मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा. आमचं सहकार्य असेल. पण राज्यासाठी जो निर्णय घेतला जाईल. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश करू नये. एक आठवड्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडला त्यातून वगळण्यात यावं. निर्णय लागू करू नये. स्थानिक प्रशासनच्या स्तरावर निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे.

Google Ad

यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादीची भूमिका मांडली. पवार यांनी लॉकडाऊनला विरोध केला नाही, पण त्यातून पुण्याला वगळण्याची मागणी केली आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच लॉकडाऊन जाहीर झाल्यास गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेतला पाहिजे. गरीबांना मदत देण्याची माझी भूमिका आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात आठ दिवसाचा कडल लॉकडाऊन लावण्याचे संकेत दिले होते. राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे. निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

24 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!