Google Ad
Editor Choice india

Delhi : आज पासून गॅस सिलेंडरच्या दरात वाढ … पहा कोणत्या गॅस सिलेंडर मध्ये झाली वाढ!

महाराष्ट्र 14 न्यूज : आजपासून १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचा दर वाढला आहे. हा सिलिंडर आता ५५ रुपयांना महाग होईल. चेन्नईमध्ये १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडर ५६ रुपयांनी महागला आहे. चेन्नईमध्ये त्याची किंमत आता प्रति सिलिंडर १४१० रुपयांवर गेली आहे. दिल्लीतील १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ५५ रुपयांनी वाढ झाली असून आता ती १२९६ रुपये करण्यात आली आहे. त्याशिवाय कोलकाता आणि मुंबईत १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ५५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. कमर्शियल सिलिंडरची नवीन किंमत कोलकाता येथे १३५१.५० रुपये आणि मुंबईत १२४४ रुपये आहे.

तथापि, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजीच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरनंतर डिसेंबरमध्ये आढावा घेताना किंमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याची भीती जरी व्यक्त केली जात असली तरी एलपीजीही महाग झालेला नाही. यापूर्वी जुलैमध्ये १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ४ रुपयांची वाढ झाली होती. त्याचवेळी जूनमध्ये दिल्लीमध्ये १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडर ११.५० रुपयांनी महागला. तर मे महिन्यामध्ये ते १६२.५० रुपयांनी स्वस्त झाले.

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!