Google Ad
Editor Choice Health & Fitness

माझे आरोग्य : मध आणि लिंबूचे एकत्रितपणे सेवन केल्यास …

महाराष्ट्र 14 न्यूज ( माझे आरोग्य ) : मध आणि लिंबू हे आपल्या रोजच्या वापरातले पदार्थ , सगळ्यांच्या घरात मध आणि लिंबू असतोच . मधाचा वापर आपण फार कमी करतो , अगदी स्पेशल डिश बनवतानाच आपण मधाची बाटली खोलतो . त्यातल्या त्यात ते मध अगदी अस्सल असले तर आई अगदी जपून ते वापरते . लिंबाचा वापर हा सतत होत असला तरी गरजेपरताच होत असतो .

कधी लिंबू सरबत हवे असेल , कधी घरात नॉनव्हेज बनले तरच लिंबू कापला जातो . पण तुम्हाला आज आम्ही या दोन्ही पदार्थांचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्हाला आजवर कोणीही सांगितले नसतील आणि हे फायदे जाणून घेतल्यावर तुम्ही सुद्धा या पदार्थांचा फक्त गरजेपुरताच वापर करणार नाही तर स्वत : चे आयुष्य सुदृढ राखण्यासाठी रोज याचा वापर कराल .

Google Ad

चला जाणून घेऊया काय आहेत मध आणि लिंबाचे लाभ जे आजपर्यंत तुम्हाला माहितच नव्हते.रोगप्रतिकारक क्षमता ज्याला इम्युनिटी सुद्धा म्हणतात ती वाढविण्यासाठी मधाचे सेवन करावे हा उपाय तुम्ही अनेकदा ऐकला असेल पण जीवनसत्त्व क ने परिपूर्ण असलेला लिंबू देखील यात तुमची मदत करू शकतो . लिंबाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती कमालीची सुधारत असल्याचा निष्कर्ष अनेक संशोधनातून पुढे आला आहे .

पण याच लिंबाच्या रसाचे सेवन तुम्ही मधासोबत केले तर रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट चांगली प्रभावी होऊ शकते . म्हणून त्यामुळे जर तुम्हाला अनेक रोगांपासून आपल्या शरीराला सुरक्षित ठेवायचे असेल तर आवर्जून लिंबाच्या रसात मध मिसळून प्या.सध्या भारतात हृदय रोगाचे प्रमाण खुप वाढले आहे . दरवर्षी भारतात लाखो लोक हृदय रोगाने मृत्यूला बळी पडतात .

याला अर्थातच कारणीभूत आहे चुकीची आहार आणि जीवनशैली ! आहाराचा आणि इतर दैनंदिन गोष्टींचा ताळमेळ नसल्याने हृदय रोगाची समस्या उद्भवते . पण यापासून तुम्हाला सुरक्षित राहायचे असेल तर लिंबू आणि मध याचे एकत्रित सेवन करा .यातील पोषक तत्वे तुम्हाला हृदयाच्या गंभीर समस्यांपासून वाचवण्याचे कार्य करतील .

अनेक जाणकार सुद्धा तरुण वर्गाला मध आणि लिंबाचे सेवन करण्याचा सल्ला देतात जेणेकरून आतापासूनच हृदय स्वस्थ असले तर हृदय रोगाचा धोका उद्भवणार नाही . रक्तदाब ही एक अतिशय मोठी समस्या आपल्या भारतीयांपुढे उभी ठाकली आहे . पूर्वी रक्तदाबाची समस्या केवळ वृद्ध व्यक्तींमध्ये दिसायची पण आता तरुण वर्गातही रक्तदाब फोफावला आहे . यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो आणि मनुष्याचे आयुष्य धोक्यात होते .

मात्र यावर एक रामबाण उपाय म्हणून लिंबू आणि मधाचे सेवन केल्यास त्यात असणारे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे मिनरल्स रक्तदाबाला दूर ठेवतील आणि आरोग्य अधिक सुदृढ होईल . सतत काम करत राहिल्याने मानसिक ताण निर्माण होतो . शरीरासोबत मन सुद्धा थकते आणि मूड ऑफची समस्या उद्भवते . अशावेळी तुम्ही मध आणि लिंबू यांचे सेवन केल्यास तुमचा मूड बुस्ट होतो .

अनेक संशोधनातून सुद्धा ही गोष्ट सिद्ध झाली असून जगभरातील लोक लेमन टी विथ हनी याच कारणामुळे पितात . यामुळे सगळा ताण निघून जातो . अगदी फ्रेश वाटते.तुम्ही घरच्या घरी टी बनवू शकता किंवा ते शक्य नसल्यास एक चमचा मध आणि दोन चमचे लिंबाचा रस पाण्यात घेऊन त्याचे सेवन करा.अनेक जाणकारांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे की वाढत्या वजनामुळे टाईप २ डायबेटीस आणि अनेक प्रकारचे कॅसर होण्याचा धोका वाढीस लागतो .

म्हणून या वाढत्या वजनाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने शक्य तितकी काळजी घ्यायला हवी . वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मध गरम पाण्यात मिसळून त्याचे से करू शकता . वजन कमी करण्याचा अतिशय प्रभावी उपाय असल्याचे गेेेलेे काही वर्षांत सिद्ध झाले आहे .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!