Google Ad
Editor Choice Health & Fitness india

Delhi : या राज्यात बर्ड फ्ल्यू चे संकट, अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी… तर, या राज्यात अलर्ट जारी!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना विषाणूच्या संसर्गाचं संकट पूर्णपणे टळत नाही, तोच देशावर आणखी एका साथीचं संकट आलं आहे. ज्या धर्तीवर काही राज्यांमध्ये सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. हे संकट आहे ‘बर्ड फ्लू’चं. कोरोनानंतर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळमध्ये ओढावलं नवं संकट. महाराष्ट्रात अद्यापही संकट नाही. अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी. बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही अधिकाऱ्यांनी हिमालच प्रदेशात असणाऱ्या कांडगा जिल्ह्यातील पोंग बांध तलावात मृतावस्थेत आढळलेल्या काही स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळल्यामुलं हे संकट आता आणखी गडद होताना दिसत आहे. तिथं राजस्थानातील अनेक जिल्ह्यांतूनही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी 170हून अधिक पक्षी मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर येत आहे.पशुपालन विभागाच्या माहितीनुसार 425हून जास्त कावळे, बगळे आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. झालावाडमधील पक्ष्यांचे काही नमुने परीक्षणासाठी भोपाळमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा पशुरोग संशोधन संस्थेकडे पाठवण्यात आले होते. ज्यामध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान, इतर जिल्ह्यातील नमुन्यांचा अहवाल अद्याप हाती आलेला नाही.

Google Ad
Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!