Google Ad
Editor Choice Pune

Pune : स्वारगेट येथील खुनाचा गुन्हा उघडकीस … गुन्हे शाखा युनिट -३ ची कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे शहरातील उघडकीस न आलेले खुनाचे गुन्हे , उघडकीस आणणे बाबत गुन्हे शाखेकडील अधिकारी यांनी युध्द पातळीवर प्रयत्न करावेत अशा सुचना वरिष्ठ अधिका – यांनी दिलेल्या आहेत . नागेश दगडू गुड वय ३७ वर्षे रा . केरुळ ता तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद हा वि ३ / ० ९ / २०२० रोजी रात्री ११/३० वा , ते १२ / ०० या चे दरम्यान तूळजापुर येथून बसने येऊन जेधे चौकाजवळ आपला मित्र कमलाकर शरनु घोडके याची तो कोथरुड येथे घेऊन जाणेसाठी येणार असल्याने वाट पहात थांबला असता अज्ञात इसमाने त्याच्याजवळ येऊन त्याच्या जवळील पैसे , व इतर ऐवजाची मागणी केली .

सदर इसमाने चोरटयास पैसे व इतर ऐवज न दिल्याने व प्रतिकार केल्याने संशयीत चोरटयाने त्यास कोयत्याने वार करुन जबर जखमी करुन त्याच्या जवळील रोख रक्कम व मोबाईल घेऊन फरार झाला . पोलीस व नागरीकांनी त्यास ससून हॉस्पिटल मध्ये नेत असता तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झाला सदर घटनेबाबत चोरीच्या उद्देशाने कोयत्याने मारुन अज्ञात चोरटयाने खुन केल्याचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास स्वारगेट पो.स्टे करीत असून समांतर तपास गुन्हे शाखेकडून चालू होता .

Google Ad

दिनांक २७ / ० ९ / २०२० रोजी गुन्हे शाखा युनिट ३ , कडील पोलीस हवालदार संतोष क्षिरसागर यांना गोपनियम माहिती मिळाली की , वरिल स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा पुणे शहरातील सराईत गुन्हेगार नामे ऋषीकेश कामठे याने केला असून त्याने इतरही जबारी चोरीचे गुन्हे केले आहेत.अशी बातमी मिळाल्यावरुन युनिट -३ , चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . राजेन्द्र मोकाशी यांनी त्यांच्याकडील पथक पोलीस उपनिरीक्षक किरण अडागळे

पोलीस हवालदार संतोष क्षिरसागर , पोलीस नाईक अतुल सावे , पोलीस हवालदार मेहबुब मोकाशी यांना नेमून वरिल संशयीत इसम नामे ऋषीकेश जिवराज कामठे वय ३४ वर्षे रा.लोकमान्य कॉलनी , गल्ली नं .१ , सी एन जी पंपाजवळ कोथरुड पुणे यास दिनांक २८ / ० ९ / २०२० रोजी ००/३० वाजता जुना कचरा डेपा , मेट्रो स्टॅन्ड जवळ कोथरुड पुणे येथून ताब्यात घेतले . पुढील चौकशीत सदर आरोपी याने स्वारगेट पोलीस स्टेशन कडील खुनाचा गुन्हा केल्याचे कबुल केले असून सदर गुन्हयात वापरलेले वाहन ज्युपिटर मोपेड ताब्यात घेण्यात आलेली आहे .

आरोपी ऋषीकेश जिवराज कामठे हा पोलीस अभिलेखा वरिल सराईत गुन्हेगार असून तो लॉकडाऊनचे काळात चार महिन्यापुर्वी कोथरुड पोलीस स्टेशन या गुन्हयात येरवडा कारागृहातून कोरोना मुळे इर्मजन्सी जामीनावर सुटला आहे . तो सिहगड रोड पोलीस स्टेशन या गुन्हयातील पाहिजे आरोपी आहे . तसेच त्याने येरवडा पो.स्टे येथे १५ दिवसापुर्वी जबरी चोरी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे . त्याचे विरुध्द पुणे शहरात यापुर्वीचे खुनाचा प्रयत्न , घरफोडी , जबरी चोरी असे एकूण १६ गुन्हे दाखल आहेत . सदरची कामगिरी बाबात मा.पोलीस आयुक्त सो , पुणे शहर यांनी पोलीस हवालदार संतोष क्षिरसागर व युनिट -३ , कडील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!