Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

विजबिलाबाबत ऊर्जामंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून, वीजबिल आकारणीचा गोंधळ दुरुस्त करा … भारतीय जनता युवा मोर्चाचे ‘शिवराज लांडगे’ यांची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या संकटकाळात जाहीर झालेल्या  लॉकडाऊन कालावधीतही भरमसाठ वीज बिल आकारणी केल्याने पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजकांना धक्का बसला आहे, हे वीजबिल कमी करावेत तसेच उद्योग मंत्री नितीन राऊत यांनी दिलेल्या स्थिर आकारपूर्णपणे माफ करण्याचे आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी ‘शिवराज सुदामराव लांडगे’ यांनी निवेदनाद्वारे महावितरणकडे केली.

लॉकडाऊन मध्ये उद्योगचक्र पूर्णपणे बंद होते. त्यातून सावरण्याचा प्रयत्न होत असताना महावितरण बिल आकारणी मध्ये बरमसाठ वाढ केल्याने उद्योग क्षेत्र हेवादील झालेले आहे. बिलामध्ये दर्शविल्याप्रमाणे इतर आकार रकमे बाबत माहिती व तपशील उपलब्ध नाही. याबाबत महावितरण’कडून कोणतीही माहिती मिळत नाही त्यामुळे बिलाबाबत गोंधळ उडाला आहे.
सदर काळातील अंदाजे रीडिंग दाखवून अधिकची रक्कम बिलात दर्शविण्यात आली आहे त्यामुळे ग्राहकांना ‘कॅरिंग कॉस्टचा ‘ भुर्दंड बसला आहे.

Google Ad

  लॉकडाऊनच्या काळातील स्थिर आकार हा पूर्णपणे माफ करण्यात येईल असे आश्वासन ऊर्जा मंत्री श्री नितीन राऊत यांनी जाहीर केले होते. परंतु तसे न होता जुलै 2020 च्या बिला पासून तीन महिन्यांसाठी आकारण्यात आलेला स्थिर आकार दरमहा बिलातून वसूल केला जात आहे. त्यामुळे एकीकडे उत्पन्न नाही आणि दुसरीकडे वसुलीच्या ह्या दुहेरी कात्रिक उद्योजक सापडलेला आहे.
आपण ह्यावर योग्य ते कारवाई करून तमाम उद्योजकांना ह्या संकटाच्या काळात मुदत व सवलत द्यावी ही विनंती भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याबरोबर उद्योग आघाडीचे अविनाश नाईक, अरविंद लंघे, नवनाथ साकोरे, रोहन उगले व इतर उद्योजक उपस्थित होते.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

10 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!