Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कोरोनाच्या काळात अविरत सेवा करणाऱ्या प्रभाग ३१ मधील आरोग्य कर्मचाऱ्यांना नगरसेविका ‘माधवी राजापुरे’ यांच्या तर्फे वाफेच्या माशीनचे वाटप!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना या आजाराचा संसर्ग मार्च महिन्यात आपल्या देशात राज्यात त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला म्हणजेच पिंपरीचिंचवड मध्ये सुरू झाला. याला आता जवळजवळ सात महिने होऊन गेले. याच आजाराला कोविड-१९ असे म्हटलं गेले.

कोविड-१९ चा संसर्ग खूपच झपाटयाने वाढत गेला, त्याला थांबवणं हे एक मोठं आव्हान प्रशासना पुढे उभे राहिले. या अचानक आलेल्या संकटाचा सामना सर्वचजण आपल्या परीने करत होते, यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले कर्तव्य निष्ठने निभवणारे योद्धे म्हणजे आरोग्य कर्मचारी ज्यांचा यात अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. या संकट काळात हा संसर्ग वाढू नये, म्हणून सर्व कामकाज बंद ठवण्यात आले लोक घरच्या बाहेर पडत नव्हते, आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी प्रत्येक नागरिक करत होता आणि आताही करत आहे.

Google Ad

अशा या महामारीच्या संकट काळात आपल्या जीवाची कुटुंबाची पर्वा न करता संपूर्ण शहर – परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती ते आरोग्य कर्मचारी होय. रात्रंदिवस जनतेच्या आरोग्यासाठी ते धडपडत आहेत. नवी सांगवी पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक ३१ मध्ये लाॅकडाऊन काळात ‘कोरोना’ या संसर्गजन्य महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता स्वच्छतेसाठी अमूल्य योगदान व सेवाकार्यासाठी मनपा सफाई कर्मचारी व आरोग्य निरीक्षक’ हे आपले कर्तव्य बजावत आहेत,

या कार्याची परतफेड करणे हे आपले कर्तव्य आहे, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने नगरसेविका माधवी राजापुरे तसेच त्यांचे पती राजेंद्र राजापुरे यांनी आपल्या आई कै. सुशीला शंकर राजापुरे यांच्या स्मरणार्थ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ८० वाफेच्या माशीनचे वाटप या आरोग्य कर्मचाऱ्यांना करण्यात आले.

काटे पूरम चौकातील महानगरपालिकेच्या बॅडमिंटन हॉल येथे हा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमास ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेविका माधवी राजापुरे ,नगरसेविका सीमा चौगुले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, भाजपचे प्रभाग ३१ चे अध्यक्ष मारुती कवडे, सांगवी-काळेवाडी मंडल उपाध्यक्ष सुरेश शिंदे, चिटणीस भाऊसाहेब जाधव, श्रीकांत पवार, बाजीराव मागाडे, अदिती निकम, संजय मराठे समाजिक कार्यकर्ते सुभाष पवार,महेंद्र राजापुरे, शिवाजी पोवार

पत्रकार संतोष महामुनी सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले साहेब, मुख्य आरोग्यनिरीक्षक अजय जाधव, आरोग्य निरीक्षक उध्दव डवरी, संजय मानमोडे, सुनिल चव्हाण व इतर सामाजिक व राजकिय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी ८० कर्मचारी व अधिकारी यांना सुरक्षा साधने वाटप करण्यात आले. संजय जैन यांनी वाफेचे मशीन कसे हाताळायचे याचे प्रात्यक्षिक कर्मचाऱ्यांना दाखविले. तसेच राजेंद्र राजापुरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आपली तसेच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!