Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : कोरोनाचा धोका टळलेला नाही, राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ आणू नका- मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा!

महाराष्ट्र 14 न्यूज : दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांनी खूप सहकार्य केलं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी ज्या धीराने माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम राबवली त्याचं त्यांनी कौतुक केलं. रुग्ण संख्या आटोक्यात असली तरी धोका टळलेला नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोरोनाची दुसरी लाट ही लाटच नसून ती त्सुनामी असेल असा इशारीही त्यांनी दिला.

Google Ad

राज्यात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येवू नये असंही ते म्हणाले. आत्ताच कोरोनाचा अटकाव करा असंही ते म्हणाले.
त्यामुळे नागरिकांनी निष्काळजीपणा करू नये असं आवाहनही त्यांनी केली. महाराष्ट्रात रात्रीचा कर्फ्यू लागू करा असं म्हणतात पण महाराष्टात आम्ही ठरवलेलं नाही. लोकांनीच नियम पाळावे असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आहे. काही राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबात अजुनही काही ठरविण्यात आलेलं नाही असेही त्यांनी सांगितलं. मंदिरं उघडली मात्र तिथे गर्दी करू नका. अनावश्यक नसेल तिथे गर्दी करू नका. लक्षणे दिसत असेल तर लगेच चाचणी करून घ्या असंही ते म्हणाले.
मास्क वापरा, वारंवार हात धुवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असंही ते म्हणाले. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत आहे. आज बऱ्याच दिवसांनी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या वाढलीआहेदिवसभरात 5 हजार 753 रुग्ण आढळले आहेत. तर 4 हजार 60 रुग्णांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले. राज्याचा Recovery Rate 92.75 एवढा झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 51 हजार 64 एवढी झालीय. राज्यात मृत्यूत आज घट दिसून आली. गेल्या 24 तासांमध्ये 50 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 17 लाख 80 हजार 208 एवढी झाली आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने सरकारही कामाला लागलं असून चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हा स्तरावरही सर्व आरोग्य यंत्रणेला सतर्क करण्यात आलं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

117 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!