Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचं थैमान थांबेना … गेल्या २४ तासातील आकडेवारी चिंताजनक!

महाराष्ट्र 14 न्यूज : देशासह राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून रूग्ण उपचारानंतर बरं होण्याच्या प्रमाणात बर्‍यापैकी वाढ झालेली दिसतेय. दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या २४ तासात १२७२ रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात आज दिवसभरात १२६५ नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. पिंपरीचिंचवडमध्ये ४१ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये १३ रूग्ण पिंपरी चिंचवड बाहेरील आहेत.

Google Ad

सध्या पिंपरी चिंचवड शहरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६१२३१ एवढी आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे तब्बल ४६९५३ रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. या बरं झालेल्या रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरीचिंचवड शहरात सध्या ६४८६ रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!