Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्याच्या जम्बो हॉस्पिटल बाबत अजितदादा भडकले … हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाईचा दिला इशारा!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे . जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत , असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल , असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले . पुण्यातील विधानभवन परिस्थितीबाबत बरिष्ठ सभागृहात आज उपमुख्यमंत्री प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांच्या आढावा बैठक घेण्यात आली , , अध्यक्षतेखाली कोरोना यावेळी ते बोलत होते .

पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या . उपमुख्यमंत्री पवार म्हणाले , संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्ण दाखल होत आहेत . कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे . कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सक्रियपणे काम करावे .

Google Ad

पुण्यातील विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना  परिस्थितीबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली , यावेळी ते बोलत होते . बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ , विभागीय आयुक्त सौरभ राव , जमाबंदी आयुक्त एस . चोक्कलिंगम , पोलीस आयुक्त डॉ . पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , के.व्यंकटेशम , पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार , जिल्हाधिकारी डॉ . राजेश देशमुख , पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर , अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद , आरोग्य विभागाच्या संचालक डॉ . अर्चना पाटील , ससूनचे अधिष्ठाता डॉ . मुरलीधर तांबे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते .

पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या . उपमुख्यमंत्री श्री . पवार म्हणाले , संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी कोरोनाबाधित रुग्ण दाखल होत आहेत . कोरोनाच्या रुग्णांना वेळेत व योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी शासकीय यंत्रणेने पूर्ण ताकदीनिशी काम करावे . कोरोना परिस्थती नियंत्रणासाठी राज्य शासन सर्व प्रकारे मदत करत असून दोन्ही महापालिकेच्या आरोग्य विभागाने देखील सक्रियपणे काम करावे .

पुण्यासह कोल्हापूर , सांगली , सातारा व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी विभागीय आयुक्तांनी नियोजनबध्द कार्यवाही करावी . विभागातील पाचही जिल्ह्यात कोरोनाविषयक काम करताना एकाच अधिकाऱ्यावर कामाचा ताण येऊ नये तसेच कामात गतिमानता येण्याच्या दृष्टीने विषयनिहाय जबाबदाऱ्या सोपवून कामाचे विकेंद्रीकरण करावे असे सांगितले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!