महाराष्ट्र 14 न्यूज : सद्यस्थितीत कोरोना महामारीमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मनपाच्या नवीन भोसरी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या एका तरुणीचा वाढदिवस रूग्णालयातील साफसफाई कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
मृण्मयी मोरे असं त्या तरुणीचं नाव असून तिला ४ दिवसांपूर्वी मनपाच्या नवीन भोसरी रुग्णालयात एडमिट करण्यात आलं आहे. सदर तरुणीचे सर्व कुटुंब कोरोना बाधित असून कुटुंबातील सर्व सदस्य नवीन भोसरी रुग्णालयात दाखल झालेले आहेत. या परिस्थितीमुळे सदर तरुणी खुप घाबरलेली होती. याबाबत मनपाचे कर्मचारी व गेल्या वर्षी नवीन भोसरी रुग्णालयात काम करत असलेले प्रदीप कोठावदे यांनी रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या मदतीने सदर तरुणीला धीर देत तिच्या मनातील भीती दूर केली.

दि.२८ एप्रिल रोजी मृण्मयीचा वाढदिवस होता. याबाबत प्रदीप कोठावदे यांनी रुग्णालयातील साफसफाई कर्मचाऱ्यांना कळविले असता सदर ५-६ रूग्णालयीन कर्मचाऱ्यांनी आवारातील झाडांच्या पाने व फुलांचा मनमोहक पुष्प बनवून मृण्मयीचा अगदी साध्या पद्धतीने मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून वाढदिवस साजरा केला.
एकीकडे कोरोना महामारीमुळे रुग्ण धास्तावले असताना साफसफाई कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे.
401 Comments