Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

लढा कोरोनाशी … कोरोनाच्या संकटातील रक्त आणि प्लाझ्माची गरज भागविण्यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचं एक पाऊल …

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी सांगवी- सांगवी, पिंपळेगुरव यांच्या वतीने भव्य अशा रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाच्या संकटकाळात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांना वरदान ठरणाऱ्या प्लाझ्माची गरज भागविण्यासाठी हे भव्य रक्तदान व प्लाझ्मादान शिबिर शनिवार दिनांक १ मे रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत नवी सांगवीतील साई चौक येथील संस्कृती लॉन्स येथे कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून भरविण्यात येणार आहे. असे शिबिराचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी सांगितले. यावेळी शिबिरात येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा २ लाख रूपयांचा अपघाती विमा उतरविण्यात येणार असून त्याच बरोबर प्रत्येक रक्तदात्यास सॅनिटायझर व मास्क भेट देण्यात येणार आहे .

Google Ad

🩸‘चला एक जीव वाचवूया’ … ‘रक्तदान व प्लाझ्मादान करूया’ …

रक्तदानाची व प्लाझ्मा दानाची गरज आजच्या या संकटात अधिक व्यापक प्रमाणत आहे. प्लाझ्मादान कोरोनाच्या संकटात रुग्णांना वरदान ठरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, कोरोनाच्या या पार्श्वभूमीव आम्ही प्लाझ्मादान करणेबाबत नागरिकांना विशेषतः युवाकांना प्रोत्साहित करून कोरोनाच्या रुग्णांना जीवनदान देण्याकरिता शिबिर आयोजित करत आहोत, असे ‘प्रशांत शितोळे’ यांनी सांगितले.

या शिबिरात शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट , पार्थ पवार फाऊंडेशन , सिझन ग्रुप सोशेल वेल्फेअर ट्रस्ट , सुवर्णयुग प्रतिष्ठान , रणझुंजार मित्र मंडळ , समर्पण युवा ट्रस्ट, ओमसाई ट्रस्ट, युवाशक्ती ट्रस्ट , आई प्रतिष्ठान, जगदंब युवा प्रतिष्ठान या संस्थांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभणार आहे, असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

कोविड-१९ लस घेतल्यानंतर ५८ दिवस रक्तदान करता येत नाही, त्यामुळे १ मे पासून १८ वर्षे वयानंतर सुरू होणाऱ्या लसीकरणापूर्वी नागरिकांनी रक्तदान करावे असे आवाहन ‘श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट’चे अध्यक्ष भूषण सुर्वे यांनी केले आहे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

66 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!